आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पै.सुजय तनपुरेने मिळवलं सुवर्णपदक!
★जामखेड तालुक्याच्या अभिमानात पै.सुजय तनपुरेमुळे भर !
जामखेड | प्रतिनिधी
अमान येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पंधरा वर्षे वयोगटाखालील जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पैलवान सुजय तनपुरेने सुवर्णपदक पटकावले आहे. या विजयी कामगिरीबद्दल जामखेड तालुक्याच्या अभिमानात भर पडले असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे…
यावर्षीच्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा अमान येथे होत असून यामध्ये जामखेड तालुक्यातील शिऊर येथील सुजय तनपुरे ने पंधरा वर्षाखालील वयोगटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे त्याबद्दल त्याच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदन आशा होत असून जामखेड तालुक्याचे नाव जगभर पोहोचले आहे.. सुजय तनपुरे यांनी मागील वर्षी पार पडलेल्या सोनीपत येथील एशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पै.सुजय नागनाथ तनपुरे याची 68 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळून जॉईड देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल देखील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता.. पैलवान सुजयच्या कामगिरीबद्दल मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन कात्रज येथील पंकज हरपुडे व महेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत मिळवलेलं हे यश देखणीय ठरली आहे. सुजयने हरियाणा पंजाब दिल्ली अशा राज्यातील पैलवानांना चितपट करत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले होते. पै. सुजयच्या यशाबद्दल आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांच्यासह सभापती संचालक कुस्तीप्रेमी सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षात केला आहे…
★ रोहित पवारांकडून सुजय ला पाठबळ!
जामखेड कर्जत मतदारसंघातील युवकांच्या पाठीवर नेहमीच आमदार रोहित पवारांकडून कौतुकाची थाप राहिली आहे. जामखेड तालुक्यातील शिरूर येथील पै.सुजय तनपुरे ने आजवर केलेल्या कामगिरीबद्दल रोहित पवाराकडून त्याच्या कार्याला कुस्ती क्षेत्राला नेहमीच पाठबळ राहिले आहे.. त्यामुळे आधीच प्रोत्साहन देखील मिळत आहे.