11.1 C
New York
Sunday, April 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

आष्टीच्या आमदारांच्या पत्रकार परिषदा म्हणजे 2024 च्या आमदारकीचे संकेत!

★आ.सुरेश धस आणि आ.बाळासाहेब आजबे यांच्यात रंगलेलं शाब्दिक युद्ध!

★ 2024 च्या आमदारकीचे उमेदवार आमदार आजबे विरुद्ध आमदार धस होण्याचे फायनल संकेत!

आष्टी | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सत्तेचा समीकरण बदलले आणि राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत जाऊन बसली त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळत आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.. विकास कामाच्या मुद्द्यावरून थेट मी आमदारकी लढत नाही तुम्ही लढू नका पर्यंत येऊन ठेपले आहे.. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आमदार बाळासाहेब आजबे यांनी अजित दादा ची भेट घेतल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्याला प्रत्युत्तर देत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत आजबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं खंडन करत थेट मी आमदारकी लढत नाही तुम्ही देखील लढू नका आशा शेवटचा मुद्द्याला हात घालत चांगलं अधिक युद्ध दोन्ही आमदारांमध्ये रंगलेले पाहायला मिळत आहे. एकूणच 2024 च्या आमदारकीची रंगीत तालीमच म्हणावी लागेल.. 2024 ला आमदारकीची उमेदवारी फायनल होण्याअदुगरच दोन्ही उमेदवारांनी आम्ही दोघेही फायनल असल्याचे संकेत दिले आहेत.. उर्वरित काय करणार हे देखील इतकेच महत्त्वाचे ठरणार आहे.. पण एकूणच जनतेचा सूर पाहता श्रीयवादाच्या लढाईत न पडता विकास कामाकडे भर द्यावा असाच जनतेतून सूर निघत आहे.

★दोन्ही आमदारांचं शाब्दिक युद्ध थेट आमदारकी न लढवण्यापर्यंत!

आष्टी मतदारसंघातील दोन्ही आमदारांकडून विकासाच्या मुद्द्यावर सुरू असलेले शाब्दिक युद्ध थेट दोघांनीही आमदारकी न लढण्यापर्यंत गेले आहे.. आमदार आजबे यांनी केलेले गंभीर आरोपाला उत्तर देत आमदार धस यांनी मी जर कुठे दोषी आढळलो तर मी 2024 ची आमदारकी लढणार नाही आणि तुम्ही जर आढळला तर तुम्ही लढू नका असा थेट आव्हानात्मक इशाराच दिला आहे. या दोन्ही आमदारांच्या प्रतिक्रियेमधून 2024 ची आमदारकीची निवडणूक या दोघांमध्येच होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत…

★आमदारकीसाठी इच्छुक उमेदवाराला डायरेक्ट फुल स्टॉप!

आष्टी मतदारसंघाच्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात विकास कामाच्या मुद्द्यावरून रंगलेलं शाब्दिक युद्ध 2024 च्या निवडणुकीचे आम्ही दोघेच फायनल उमेदवार असल्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या इच्छुक उमेदवाराला डायरेक्ट फुलस्टॉपच मिळाला म्हणावा लागेल..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!