3.6 C
New York
Wednesday, April 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुसळंब – वांजरा फाटा निकृष्ट रस्त्याची घातली वास्तुशांती!

★ विभागीय गुण नियंत्रण विभागामार्फत तपासणी करावी मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांची मागणी

★गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचा संगनमत आहे की काय ? नागरिकांचा सवाल!

★कुसळंब – वांजरा फाटा रस्ता आता नव्याने करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा जनतेचा इशारा!

कुसळंब | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा ते कुसळंब, पिंपळवंडी निकृष्ट रस्त्याची विभागीय गुण नियंत्रण पथकामार्फत तपासणी करावी अशी निवेदन महाराष्ट्र निर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दिले आहे. अतिशय निकृष्ट पद्धतीने सदर रस्ता काम झालेले आहे, असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पाटोदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना सांगूनही तशाच पद्धतीने नित्कृष्ट काम झालेले आहे. सदर रस्ता काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. या रस्ता कामावर आहे कमी प्रमाणात डांबराचा वापर केला गेला आहे. अशा पद्धतीने डांबर कमी वापरल्याने रस्ता हाताने उकरला जात आहे यामुळे रस्ता तीन महिन्यांत खराब झालेला आहे. सदर रस्ता दोन महामार्गाला जोडलेला असल्याने सदर रस्त्याचे काम चांगलं होणं खूप गरजेचं होतं परंतु या कामांमध्ये अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता अनियमित करून देयके उचलून शासनाच्या निधीवर डल्ला मारलेला आहे या कामाचे विभागीय गुण नियंत्रण विभागामार्फत तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर तसेच पाटोदा तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी रस्ता कामाची वास्तू शांती घालून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक. २.बीड व उप अभियंता पाटोदा यांना जेवणाचे निमंत्रण देवून आंदोलन केले व कार्यकारी अभियंता यांच्याकडे कारवाईची मागणी केलेली आहे.

★रस्त्याची वास्तुशांती झाल्याने मनसेने घातली वास्तुशांती!

कुसळंब वांजरा फाटा हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आला परंतु चारच महिन्यात या रस्त्याची वास्तुशांती झालेली पाहायला मिळाले यामुळे मनसे कडून या रस्त्याची हार फुल वाहत वास्तुशांती घालण्यात आली आता तरी प्रशासन वास्तुशांतीचा प्रसाद खायला येणार का ? का लांबूनच त्यांना निवत धाखावा लागेल…

★स्थानिक पत्रकारांकडून वेळोवेळी आवाज उठवला गेला ; संबंधित अधिकारी मूग गिळून गप्प!

स्थानिक पत्रकारांकडून वेळोवेळी या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवला गेला आहे.. संबंधित गुतेदाराकडून तात्पुरत्या स्वरूपात थातूरमातूर काम करण्यात आले परंतु कोट्यावधीचा रस्ता आज अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. संबंधित अधिकारी काही ॲक्शन घ्यायला तयार नाहीत.. याचा अर्थ काय होतोय ? अधिकारी आणि गुत्तेदार संगणमतानं सुरू आहे की काय असाही प्रश्न नागरिकांमधून पुढे येत आहे…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!