-0.3 C
New York
Wednesday, April 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

नामदार धनुभाऊंचे अभूतपूर्व रॅलीने आ.बाळासाहेब आजबेंकडून स्वागत!

★कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचे स्वागताला संपूर्ण आष्टी मतदारसंघ उभा !

 

★पाटोद्यात बांगर कुटुंबीयांकडून नामदार धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत!

★कड्यापासून पाटोद्यापर्यंत आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नियोजनातून सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य स्वागत!

आष्टी | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी नामदार धनंजय मुंडे यांची निवड झाल्या नंतर प्रथमच बीड जिल्ह्यात त्यांचे आगमन झाले असता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या नेतृत्वाखाली धानोरा, कडा ,आष्टी या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामदार धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
अनेक ठिकाणी स्वागताच्या कमानी फटाक्यांची आतषबाजी बाजीत आष्टी मतदार संघात स्वागत करण्यात आले आष्टी तालुक्यातील धानोरा येथे दीड क्विंटल वजनाचा फुलांचा हार कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या साठी क्रेनच्या सहाय्याने आणला होता तर कडा व आष्टी येथे दोन क्विंटल फुलांच्या हराने धनंजय मुंडे यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले, राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार कॅबिनेटमंत्री पदी नामदार धनंजय मुंडे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी घेतलेल्या निर्णयाचे मतदारसंघात जोरदार स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने आष्टी तालुक्यातील कार्यकर्ते ठीक ठिकाणी स्वागतासाठी उभे होते कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ना, धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात येत असल्याने त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. आ.बाळासाहेब आजबे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ५०० किलो वजनाचा फुलांचा हार बनवण्यात आला होता स्वागतासाठी फुलांची उधळण ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करत आष्टी मतदारसंघात स्वागत करण्यात आले. यावेळी आ.बाळासाहेब आजबे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जि.प. सदस्य सतिश शिंदे, परमेश्वर शेळके, काका शिंदे,महेश आजबे,शिवा शेकडे,शिवाजी नाकाडे,बबन काळे,बबन डोके,जालिंदर नरवडे, भाऊ घुले,नाजिम शेख,अक्षय हळपावत,अशोक पोकळे, राजेंद्र जरांगे,महादेव कोंडे,भरत भवर, यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

★आष्टी मतदारसंघाच धनुभाऊं वरील प्रेम अभूतपूर्व!

आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली कड्यापासून पाटोद्यापर्यंत विविध ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.. क्रेनच्या साह्याने हार, जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत तोफांच्या आतिषबादीची सलामी देत अभूतपूर्व स्वागत आष्टी मतदारसंघामध्ये करण्यात आले…

★पाटोद्यात क्रेनच्या साह्याने हार व जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण!

पाटोद्यामध्ये बांगर कुटुंबीयांकडून नामदार धनंजय मुंडे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.. क्रेनच्या साह्याने हरा व जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत फटाक्याच्या आतिषबाजीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे पाटोद्यामध्ये बांगर कुटुंबियाकडून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले…

★राहिलेल्या विकास कामांना गती मिळणार

आष्टी मतदार संघाच्या विकास कामांना अधिक गती मिळणार आहे.. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून आष्टी मतदार संघामध्ये विविध विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न झाला आहे.. आता राष्ट्रवादी सत्तेमध्ये सहभागी झाल्याने विकास कामात अधिक भर पडणार असल्याने आष्टी मतदारसंघाला अधिक चांगले दिवस येतील यातही तीळ मात्र शंका उरली नाही..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!