10.6 C
New York
Monday, April 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातुन जाणारा खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६८ सी हा माजलगाव तालुक्यातुन जाणारा रस्ता रस्ते विकास महामंडळा मार्फत माजलगाव ते केज ६० किलोमीटर किंमत २८८ कोटी रुपये असुन या मार्गावर माजलगाव ते तेलगाव दरम्यान अत्यंत निकृष्ट कामामुळे रसत्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनांची चाके अडकुन अपघातांचे प्रमाण वाढले असुन तात्काळ दूरूस्ती करण्यात यावी व संबंधित कंत्राटदार दिलिप बिल्डकॉन कंपनी व कार्यकारी अभियंता यांच्यावर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल, यांना दि.२४ जुलै रोजी मार्गावर पात्रुड गाव बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

★जिल्हाधिकारी यांचे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना पत्रक

अपर जिल्हादंडाधिकारी बीड संतोष राऊत यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दि.२६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने दि.१३ जुन रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद यांना निवेदन प्रकरणी नमुद मुद्यांबाबत तात्काळ चौकशी करून शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाही बाबत संबंधित अर्जदार यांना परस्पर कळविण्यात यावे असे नमूद केले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!