★५ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक तर १५ विद्यार्थी गुणवत्तेत पात्र!
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
यांत एकच ध्यास गुणवत्ता विकास हे बोधवाक्य घेऊन अल्पावधीत नावारूपाला आलेल्या पाटोदा येथील ओम कोचिंग क्लासेसच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने क्लासेसच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.जाहीर झालेल्या या निकालात पुन्हा एकदा दरवर्षी प्रमाणे येथील ओम कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.तब्बल ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून ओम कोचिंग क्लासेसच्या प्रा. खंडागळे सरांनी आम्हाला घडवलं,त्यांनी करवून घेतलेल्या नियोजनबध्द अभ्यासामुळे हे यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.२०१६ पासून तर आजपर्यंतच्या प्रत्येक वर्षी ओम कोचिंग क्लासेस ने निकालाची सर्वोत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे.याअगोदर ही क्लासच्या ४ विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड तर शिष्यवृत्ती परीक्षेत आजवर ६० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.त्यामुळेच नवोदय,स्कॉलरशिप,यांसह विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आजघडीला ओम कोचिंग क्लासेस मधे प्रवेश घ्यायला प्राधान्य देत आहेत. डीएड, बीएड तसेच एम एड झालेले प्रा. सोमनाथ खंडागळे यांच्या मार्गद्शनाखाली विद्यार्थी घडत आहेत. अखंड मेहनत,विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी शैली,विद्यार्थ्यांच्या पालकांशी नियमित संवाद यामुळे अवघ्या ५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला त्यांचा ओम कोचिंग चा प्रवास आज शेकडोंच्या संख्येत जाऊन पोहोचला आहे. या क्लास मध्ये सध्या ५ वी नवोदय, स्कॉलरशिप, राज्यात घेतल्या जाणाऱ्या विविध खासगी स्पर्धा परीक्षा यांसह ५ वी पासूनच नीट परीक्षेच्या तयारीसाठी एन सी आर टी अभ्यासक्रमाच्या विज्ञान विषयाच्या,तसेच ५ वी ते ८ वी पर्यंतच्या इग्रजी विषयाच्या नियमित शिकवणी सुरु आहेत.
★हे आहेत गुणवंत!
यंदा शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्कर्षा कल्याण पाळवदे,राजनंदिनी मेघराज कदम, श्रेया अण्णासाहेब खंडागळे,माधवी महादेव वराट आणि प्रथमेश राहुल मगर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.