केज तालुक्यात अनेक ठिकाणी महाबीज कंपनीचा सोयाबीन बीयाणे उगवलेच नाही
बीड | प्रतिनिधी
जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे पाहिले जाते त्या शेतकऱ्याला मात्र अनेक ठिकाणाहून फसवणुकीला सामोरे जावे लागत असते. बियाणे खरेदी पासून ते शेतातील मालविक्री करेपर्यंत या शेतकर्याची फसवणुक होत नाही असे ठिकाण सापडणे अशक्य आहे.
केज तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन या उगवल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन कंपनीच्या विषयी तीव्र असंतोष पसरलेला पहावयास मिळत आहे. पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे विकत घेण्यासाठी पैशाची तड-जोड करावी लागते. अनेक शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून काळ्या आईची ओटी भरावी लागते. पेरलेले उगवेपर्यंत शेतकऱ्यांच्या मनाला समाधान लागत नाही. कारण अनेक कंपन्या या बियाणामध्ये डुप्लिकेट पणा करत असतात आणि हाच डुप्लिकेट पणा शेतकऱ्यांच्या मुळावर येऊन त्यांची फसवणूक करत असतो. अशाच या कंपन्यांमध्ये महामंडळाचे महाबीज सोयाबीन बियाणे हे ही या वर्षी मागे सरकले नाही. कारण केज तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी या महाबीज कंपनीच्या बियाणे खरेदी केलेली आहे. परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बियाणे मात्र उगवले नसल्याची तक्रार त्यांनी कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच कृषी विभाग यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. यातलेच एक उदाहरण म्हणजे केज तालुक्यातील सारणी (सां) येथील शेतकरी उत्तरेश्वर गोविंद देशमुख यांनी महामंडळाचे महाबीज हे बियाणे पेरणीसाठी घेतले होते परंतु त्यांची बियाण्यामधील एक बॅग ही उगवलीच नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यावर असे दुबार पेरणीचे संकट आले आहे.
★एक बॕग उगवली नसल्याने आम्हाला पुन्हा दुबार पेरणी
आम्ही विश्वासाने महामंडळाचे महाबीज या कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेऊन पेरणी केली परंतु यातील एक बॕग उगवली नसल्याने आम्हाला पुन्हा दुबार पेरणी करावी लागली आहे.