20.5 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख विचार मंचचा एल्गार मोर्चा!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख विचार मंचचा एल्गार मोर्चा!

पाटोदा | प्रतिनिधी

आज दिनांक 13 जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख विचार मंचच्या वतीने ” बेटी बचाव बेटी पढाव ” च्या विशेष मागणीला लक्ष करत पाटोदा तहसीलवर एल्गार मोर्चा झाला.या मोर्चात खालील मागण्यावर प्रमुख पाहुणे व विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर विश्लेषण करून शासनाला मागण्या मान्य करण्याच्या गंभीर इशारा दिला यामध्ये १) सर्व राज्यातील जाती धर्मातील मुलींना ५० रुपये रोज उपस्थित भत्ता मिळावा २) खुल्या प्रवर्गातील मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ४०० मुलींचे वसतीगृह व तालुक्याच्या ठिकाणी २०० मुलींचे वस्तीगृह मंजुर करावे ३) आर्थिक कारणांमुळे माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची गळती होत आहे ती थांबवावी ४) दारीद्रय रेषेचा निकष प्रतीवर्षी ७० हजार रुपये निश्चित करावा ५) देशातील महिला मुलीच्या संरक्षणाचे कडेकोट आमल बजावणी करावी ६) महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलींना मोफत उच्च शिक्षणाची तरतूद करावी. या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन दलित मित्र पुरस्कार विजेते पेन्टर एकबाल यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थित भत्ता ५० रुपये रोज करावा अशी मागणी केली. तर महाराष्ट्रातील पहिली ते बारावी वी पर्यंतच्या मुलींना उपस्थिती भत्ता प्रतीदिनी ५० रुपये मिळे पर्यंत महाराष्ट्रात संघर्ष जारी राहील असे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष काॕ.महादेव नागरगोजे असे बोलले तर प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते अरुण जाधव यांनी या मोर्चाचा पाटोद्यातुन निघालेला आवाज विधानसभेत गाजल्याशिवाय रहाणार नाही असे सुतोवाच त्यांनी केले.या मोर्चात शेकडोच्या संख्येने बालिका व महिलांचा समावेश होता या मोर्चाचे नेतृत्व शेकापा सचिव मंडळाचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव, तरुण कार्यकर्ते गणेश जी कवडे, ह.भ.प रामकृष्ण रंधवे महाराज, राजेंद्र खाडे, भागवत नागरे,शेख इम्राननुर, काॕ.चाऊस पठाण, दिलीप गाडे, काॕ.सय्यद अश्रफभाई,विष्णुपंत गाडेकर, बाबासाहेब आडागळे, पेंटर संतोष तांबे,रामदास भाकरे, बाजीराव पवळ, कॉ.भगवान जावळे,सुरेंद्र तिपटे,कॉ.विठ्ठल पवळ,शंकर घाडगे, राजाभाऊ जायभाय, महिला आघाडीचे नेते गंगाबाई घोलप, जयश्रीताई जावळे, सुमनबाई शिरसाट, लियाकत बी पठाण यांनी नेतृत्व करून हा एल्गार मोर्चा यशस्वी करण्याकरिता कठोर परिश्रम घेतले. या मोर्च्याचे निवेदन मुली महिलांचे हस्ते नायब तहसीलदार मुजावर साहेब यांना देण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!