★खाजगी वाहनातून कर्मचाऱ्यांना पाठवून सापळा लावत पिकअप घेतला ताब्यात!
बीड | प्रतिनिधी
कर्नाटकातून बीड जिल्ह्यात पिकअपमध्ये गुटखा येत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यावरुन नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला.
यामध्ये वापरण्यात आलेला पिकअप जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुटखा मालकासह तिघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातून गुलबर्गा येथून सोलापूर-बीड रोडने गुटखा घेवून पिकअप येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. विलास हजारे यांनी खाजगी वाहनातून कर्मचार्यांना पाठवत सापळा लावत हा पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १६ लाख ४२ हजार २५० रुपयांचा गुटखा आढळून आला. पिकअपसह २३ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे, पोह.प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, बालासाहेब ढाकणे, यांनी केली.