12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

जनतेच्या हितासाठी आ.आजबेंकडून विरोधकांना ” बरं तुम्हीच विकासपुरुष ” चा टोमणा!

★जे काही केलं ते आ.धस यांनीच आता विकास कामात खोड नको आ.आजबेंचा हल्लाबोल!

★आ.बाळासाहेब आजबे यांनी आ.धस यांचा पाढा वाचत विकासाच्या दिशेने चालण्याचा दिला संदेश!

★जनतेचे चांगले काम करून नाव कमवायचं त्यांच्या चांगल्या कामात आडवं करून नाही!

आष्टी | प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा आणि तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी महत्वाचा असेला खुंटेफळ प्रकल्प आणि आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामावरून दोन आमदारांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. आज दि. 12 रोजी आ. आजबे यांनी त्यांच्या कार्यालयात पञकार परिषद आयोजित केली होती. शासनाने कामाची काढलेली निविदा चुकीचे आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे, कोण चुकीचे आणि कोण बरोबर हे मतदारसंघातील जनतेला चांगलंच माहिती आहे ,आ. सुरेश धस यांनी खुंटेफळ प्रकल्पाच्या भुसंपादन आणि इतर कामात फक्त व्यवहार पाहिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. आष्टी उपसा सिंचन प्रकल्पालाच्या ई निविदेला आ.धस यांच्या पञामुळेच स्थगिती मिळाल्याचे पत्र यावेळी पत्रकारांना दाखवले आ, धस हे मतदार संघाच्या विकास कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप आ. बाळासाहेब आजबे यांनी पञकार परिषदेत केला.
पञकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेली निविदा ही चुकीची आहे म्हणण्याइतपत मी हुशार नाही परंतु ज्यांना जे अतिहुशार निविदा चुकीचे आहे म्हणत आहेत त्यांनी याची शहानिशा करावी विनाकारण विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करून प्रत्येक गोष्ट मीच केली असे म्हणणे चुकीचे असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे म्हटले, खुंटेफळ प्रकल्पात पाणी आले तर तालुक्यातील दुष्काळ हा कायमचा मिटेल. परंतु आ. सुरेश धस यांना या प्रकल्पात पाणी येऊ द्यायचेच नाही हेच यावरून दिसते आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी व्यवहार पाहिला असुन शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. येथिल मुळ मालकांकडून जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर कोणी खरेदी केल्या आहेत. जमिनी घेऊन त्या डेव्हलप करून शासनाची कोट्यावधी रूपयांची फसवनुक केली आहे. मावेजाच्या यादीत स्थानिकच्या शेतकऱ्यांपेक्षा बाहेरच्या शेतकऱ्यांची जास्त नावे आहेत. खुंटेफळ प्रकल्प आणि स्थलांतर होणाऱ्या ठिकाणी जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली असुन काही आधिकार्यांनी देखील येथे जमिनी खरेदी केल्याचा आरोप आ. आजबे यांनी केला आहे. त्याच बरोबर आष्टी उपसा सिंचन योजनेच्या ई निवेदेला आ. सुरेश धस यांनी स्थगिती मिळावी यासाठी उपमुख्यमंञी यांना पञ दिले होते. त्यामुळे स्थगिती देण्यात आली. हि स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी आपण उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे केली आहे. व याबाबत ते सकारात्मक आहेत. परंतु आपण तालुक्याचा विकास करत असल्याचे आ. धस दाखवत असल्याचे आ. आजबे म्हणाले. श्रेय घायचे असले तर घ्या पण तालुक्याच्या विकासात आडवे येऊ नका असही त्यांनी पञकार परिषदेत सांगीतले.

★जलजिवनचा बट्ट्याबोळ

आष्टी तालुक्यातील जलजीवन योजनेत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. अनेक गावांना जवळ चांगले व शाश्वत जलस्रोत असुन देखील लांबचे स्रोत निवडले आहेत. यामुळे अनेक गावांना खरच पाणी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भ्रष्टाचारामुळे हि योजना फेल होईल आणि पाण्यासाठी लोकांना ञास सहन करावा लागेल पुढील वीस – पंचवीस वर्ष जलजीवन राबवलेल्या गावांना पाणी पुरवठ्याची योजना येणार नाही. जलजिवन चे कामे दर्जेदार होने गरजेचे आहे. सद्या आष्टी विधानसभा मतदार संघातील जलजीवन च्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी आपण करणार असल्याचे आ. आजबेंनी पञकार परिषदेत सांगीतले.

★आ.आजबेंनी विरोधकांना दिले पत्रकार परिषदेमधून स्वीट पॉयझन!

आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी विकास कामाच्या बाबतीत घेतलेल्या मंत्र्यांच्या भेटी आणि त्यावर आमदार धस यांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यातून रंगलेलं शाब्दिक युद्ध त्याचं खंडन करण्यासाठी आमदार अजबेंनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे विरोधकांना दिलेलं स्वीट पॉयझनच म्हणावं लागेल अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!