★कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर व्यवस्थापनाची दिली शेतकऱ्यांना माहिती
पाटोदा | प्रतिनिधी
यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाडा उलटल्यानंतर पाऊसाने आगमन केले त्यामध्ये म्हणावे तसा पाऊसमान झालेला नसुनही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सद्य परिस्थितीत शेतकरी आजही चातका प्रमाणे पाऊसाची वाट पाहत आहे.तर रिमझिम पाऊसावर सोयाबीनचे पीक चांगले आले असतानाच शंखी गोगलगायचा पार्दुरभाव दिसून येऊ लागल्याने शेतकऱ्यांना या शंखी गोगलगायची धास्ती वाटु लागली आहे. कारण मागील ३ ते ४ वर्षांपासून पाटोद्यात शंखी गोगलगायचे प्रमाण अत्यंत अल्प होते होते. मात्र हे प्रमाण वाढु लागल्याने शेतकऱ्यांतुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामध्ये प्रामुख्याने शंखी गोगलगाय ही सोयाबीनचे कोवळी कोंब खात असल्याने पुर्ण सोयाबीनचे रोप वाया जात आहे. शंखी गोगलगायही रात्री किंवा पहाटे नुकसान करीत असून दिवसा ती जमीनीत किंवा बांधावर लपुन राहत राहत आहे. सध्या ढगाळ वातावरण शंखी गोगलगायसाठी पोषक असल्याने तिचा वावर वाढला असून पुढील नुकसान टाळण्यासाठी तिचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. याच संदर्भात पत्रकार तथा शेतकरी जावेद शेख यांनी पाटोदा कृषी अधिकारी यांच्याकडे शंखी गोगलगाय संदर्भात तक्रार केली असता कृषी अधिकारी श्री.नाथराव शिंदे साहेब व कृषी सहायक राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शंखी गोगलगायचा कश्या प्रकारे व्यवस्थापन करावे याची माहिती देतांना म्हणाले की जमिनीची खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत. गुळाच्या द्रावणात १ किलो गुळ प्रती १० लिटर पाणी गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात / पिकाच्या ओळीत पसरून द्यावीत. त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून मिठाच्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात टाकून माराव्यात किंवा खोल खड्यात पुरून वरून मिठ किंवा चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा. लहान गोगलगायीच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत सभोवती बांधापासून आतल्या बाजूने चुन्याचा १० से.मी. पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.किंवा पार्दुरभाव जास्त अढळून आल्यास मेटाअल्डीहाईजड (स्नेककिल)किटनाशकाचा वापर करावा व कृषी विभागाशी संपर्क साधण्याचा शेतकऱ्यांना आवाहन केले..