19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांनो आता कसं! शेत भाड्याने द्यायला बरं वाटलं आता शेतात जायचा रस्ताच बंद!

★रेनिव्ह पॉवर कंपन्यानीला शेत भाड्याने देऊन शेतकऱ्यांनी स्वतःच्याच पायावर मारला धोंडा!

पाटोदा | प्रतिनिधी

रेनिव्ह प्रा.लि. पॉवर कंपनी व वेदांश इन्फ्रा प्रा.लि. कंपनी या दोन कंपन्यानी शेतात जाणारा नकाशावरील शेतात जाणारे रस्ते जूना वैद्यकिन्ही ते लिंबागणेश रस्ता व वैद्यकिन्ही महाजनवाडी, वाघीरा शिव रस्ता बंद केला आहे. या बाबत शेतकर्यीनी तहसील कार्यालयाकडे दि. 26/06/2023 रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे .सदर अर्जावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे शेताची मशागत, पेरणी करण्यासाठी विलंब झालेला आहे. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झालेले आहे तरी सदरील रस्ते तात्काळ मोकळे करुन देऊन चालु करण्यात यावेत.सदरील दोन्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तोंडी विचारणा केली असता ते म्हणाले आशा कितीपण तक्रारी दिल्यातरी आमचे काही होत नाही सर्व अधिकारी व राजकीय पुढारी यांना आम्ही पैसे दिलेले आहेत त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही आम्ही तुम्हाला रस्ता देणार नाहीत तुम्ही कोठेपण जा आमच्या कंपाऊड मधुन जायचे नाही. शेतकरी हा अल्पभुधारक शेतकरी असुन कुटूंबाचा उदरनिर्वाह हा याच शेतीच्या पिकावर अवलबून आहे सध्या पेरणी न झाल्यामुळे माझ्या कुटूंबावर संकट आलेले आहे.तात्काळ संबधीत कपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करून माझा रस्ता मला मोकळा करुन देण्यात यावा मी दिलेल्या अर्जाची व दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा कसलाही विचार केला नाही व अधिकारी यांनी दखल घेतली नाही त्यामुळे माझ्या शेतात पेरणी झालेली नाही माझे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे माझ्या आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे.तरी विनंती की, दि. 14/07/2023 पर्यंत संबधीतावर कंपनीवर कडक कारवाई करुन माझा रस्ता मोकळा करून देण्यात यावा नसता मी कोठेही आत्महत्या करील याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी दोन्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व शासन यांच्यावर राहील. अशी लेखी तक्रार नामें सत्यवान जयवंत शिंदे या शेतकरयांनी पाटोदा तहसील कार्यालयाकडे देण्यात आली आहे..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!