केवळ अर्ध्या तासात ८० टक्के चार्जिंग !
एल बी डक यांच्या ई वी चार्जिंग सेंटरचे थाटात उद्घाटन
बीड / प्रतिनिधी
डिझेल प्रेट्रोल चे वाढते दर व दिवसेनदीवस वाढत चालले प्रदूषण आटोक्यात अनन्या साठी शासनाने इलेट्रिक वाहने बाजारात आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नांना यश ही मिळत आहे आपल्या कडे सद्या तरी टू व्हिलर व फोर व्हिलर वाहने भरपूर लोकांनि घेतली आहे आणि काहीजण घेण्याची तयार करत आहेत मात्र या वाहनांना चार्ज कोठे करायचे ही एक समस्या आहे कारण घरी ही व्यवस्था होत नाही आणि घरी चार्जिंग साठी वेळ ही खूप लागतो आणि लाईट बिल पण जास्त लागते त्या मुळे चार्जिंग ची समस्या वाहन धारकांना जाणवते नेमकी हीच समस्या दूर करण्यासाठी येथील एल बी डक पेट्रोलियम चे मालक डॉ सचिन डक यांनी ओळखली आणि अतिशय उच्च प्रतीची ई वी मशीन त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय महामार्ग ६१(२२२) वर असलेल्या त्याच्या पेट्रोल पंपाच्या बाजूलाच बसवली त्या मशीन ची विधिवत पूजाकरून अहमदनगर येथील टेरो टरी चे मॅनेजर सुधीर कनाल , इंजिनिअर अभिजित कुमार , सेल्स ऑफिस सर हर्षल झाडे व डॉ मयुरी डक यांच्या हस्ते काल दि ११ जुलै रोजी करण्यात आले यावेळी कर्मचारी व वाहन धारक उपस्थित होते. या ई वी चार्जिंग ची खासियत अशी आहे की ३० के व्ही चे उच्च प्रतीचे हे मशीन आहे केवळ अर्ध्या तासात ८० टक्के वाहन चार्ज होते २२ रु पर युनिट वीज आकार आणि एका चार्जिंग मध्ये सुमारे २००/३०० की मी वाहन आरामात जाऊ शकते जे सबसिडी रेट आहेत तेच आकारले जातात त्या मुळे वाहन धारकांचा वेळ आणि पैसा दोन्ही ची ही बचत होत असल्याचे ई वी चार्जिंग सेंटर चे संचालक डॉ सचिन डक यांनी बोलतांना सांगितले. साड्या तरी बीड जिल्ह्यात असे पाच सेंटर आहेत पैकी माजलगाव चे एक आहे, आणि ते कार्यान्वित पण झाले आहे. या चार्जिंग सेंटर मुळे अनेकांना आपल्या वाहनांना आता घरी तासंतास चार्जिंग लावण्याची गरज पडणार नाही..