19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा तुघलकी निर्णय रद्दबातल करा!

★लक्ष्यवेधी आंदोलनाचा ईशारा – डॉ.गणेश ढवळे

बीड | प्रतिनिधी

जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरूपावर तात्पूरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश हा डीएडबीएड असणा-या लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांचा रोजगार हिरावुन घेणारा व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षण व्यवस्था उद्धव करणारा शासन निर्णय रद्दबातल करण्यात यावा यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षणमंत्री, उपसचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) मंत्रालय, आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदनाद्वारे लक्ष्यवेधी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.निवेदनावर शेख युनुस, धनंजय सानप, कालिदास वनवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय उप सचिव महाराष्ट्र शासन तुषार महाजन यांनी दि.०७.०७.२०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा शासन आदेश हा डीएड बीएड असणा-या लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांचा रोजगार हिरावुन घेणारा व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त करणारा असुन सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे हा प्रकार भविष्यात नेहमीच शिक्षक न भरण्यासाठीच्या शासन धोरणाची चाचपणी करणारा असुन हा पायंडा यशस्वी झाल्यास नियमित शिक्षक सेवेत नियुक्त केले जाणार नाहीत.त्याचे दुरगामी परीणाम गोरगरीब, वंचित,कष्टकरी शेतकरी मजुरांच्या बेरोजगार पाल्यांवर परीणाम करणारा आहे.महाराष्ट्रात लाखो शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त तरूण बेरोजगार आहेत.मागील १३ वर्षांपासून लाखो पदवीप्राप्त उमेदवार शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.भरतीची वाट पाहणा-या अनेक उमेदवारांचे नोकरी आणि लग्नाचे वय सरून जात असुन त्यांना खरी नोकरीची गरज आहे अशा बेरोजगारांना डावलुन सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नियुक्त करणे संयुक्तिक नसुन सेवानिवृत्तांना ब-याच मर्यादा पडतात.त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक निर्णयाचा फेरविचार करुन आदेश तात्काळ रद्दबातल करावा.

★ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा – धनंजय सानप

जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याऐवजी ईतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परीषदेच्या शाळेत समायोजन करण्यात यावे.यापुर्वी दिलेले योगदान लक्षात घेता प्राधान्याने त्यांचा विचार करून नियुक्ती करण्यात यावी…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!