धन्य तो कुसळंब – वांजरा फाटा रस्ता अन् धन्य ते पाठक साहेब!
★पाठक साहेब वांजरा – फाटा कुसळंब रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या तोंडी फक्त तुमचेच नाव
कुसळंब | प्रतिनिधी
कुसळंब – वांजरा फाटा हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केला.. पण पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांच्या तोंडी फक्त एकच नाव ऐकायला मिळत आहे धन्य तो कुसळंब – मांजरा फाटा रस्ता अन् धन्य ते पाठक साहेब हेच नाव प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नागरिकाच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे…
वांजरा फाटा कुसळंब पिंपळवंडी हा महत्त्वाचा रस्ता कोट्यवधी रुपये खर्च करून मंजूर केला आणि कामाला सुरुवात देखील झाली त्यामधील मांजरा फाटा कुसळंब रस्ता तयार करून वाहतुकीसाठी अतिशय लवकरात लवकर सुरू झाला त्याबद्दल नागरिक आभार व्यक्त करत होते.. परंतु तोच रस्ता पहिल्याच पावसात खड्डेमय झाल्याने नागरिक आता धन्य तो कुसळंब वांजरा फाटा रस्ता आणि धन्य ते पाठक साहेब असंच म्हणत आहेत.. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याची पुन्हा तीच अवस्था होणार असेल तर काय म्हणावं हाच प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.. आता बोलण्यासारखं काहीच उरले नाही त्यामुळे नागरिक गप गुमान त्याच कोट्यावधीच्या रस्त्यावरून खड्ड्यातून जाताना दिसत आहेत.. आता याकडे अधिकारी वर्ग लक्ष देणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. का पुन्हा तोच खड्ड्याचा त्रास सहन करायचा प्रश्न उपस्थित होत आहे..
★पाठक साहेब नागरिकांच्या तोंडी फक्त तुमचेच नाव ; मग ते कोणते ओळखा ?
कुसळंब वांजरा फाटा रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या तोंडी फक्त पाठक साहेबांचेच नाव ऐकण्यास मिळत आहे.. पण नागरिक काय बोलतात स्पष्ट ऐकू येत नसल्याने जनता संभ्रमात पडली आहे.. लोकांना ऐकू येणे अगोदर पाठक साहेब हा रस्ता दुरुस्त करून घ्या.. जनता खूप हुशार आहे.. ऐकू येत नसेल तर मोठ्याने सुद्धा बोलते बरं…. हा रस्ता आता हॉट मिक्स चा एक थर दिला तरच टिकेल अन्यथा जैसे थे अशीच अवस्था होईल…