कोट्यावधीचा कुसळंब – वांजरा फाटा रस्ता पहिल्याच पावसात गेला खड्ड्यात!
★चांगलं चांगलं म्हणता म्हणता चांगलेच लुटलं की राव ?
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून कुसळंब कडे पाहिलं जातं त्याच गावाला जोडणारा वांजरा फाटा कुसळंब रस्ता हा कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला परंतु पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेलेलं पाहायला मिळते. मग चांगलं चांगलं म्हणता म्हणता चांगलंच लुटलं की काय ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून हा रस्ता दळणवळणासाठी चांगला होईल अशी अपेक्षा होती परंतु पहिल्याच पावसात पूर्णपणे रस्ता खड्ड्यात गेला आहे तो चक्क खड्डेमय झाल्याने पूर्ण कोट्यावधी रुपये पाण्यातच गेले म्हणावे लागेल.. नागरिक म्हणत आहेत कोट्यावधी रुपये नेमकं गेले कुठे ? पहिल्याच पावसात रस्ता जर खड्डेमय होत असेल तर रस्ता केला का फक्त खडीकरण हा ही प्रश्न उपस्थित झाला आहे.. संबंधित अधिकाऱ्याने याकडे गांभीर्याने पाहावे अन्यथा कठोर पाऊल उचलले जाईल अशी नागरिकांमधून सूर निघू लागले आहेत.. आता पूर्णपणे हा रस्ता खराब झाल्याने वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा थर देण्यात यावा.. अन्यथा जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली जाईल असेही बोलला जात आहे.. आता थातूरमातूर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याने गांभीर्याने घ्यावे अन्यथा नागरिक कठोर पाऊल उचलतील आणि मग संबंधित सर्वांनाच गंभीर व्हावे लागेल. असाही नागरिकांमधून सूर येत आहे..
★चांगल्या रस्त्याची पूर्ण वाट लावली की राव!
वांजरा फाटा – कुसळंब रस्ता पहिला चांगला होता की राव अशी म्हणण्याची वेळ आली आहे.. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता मंजूर करून तयार केला परंतु तो एकच महिन्यात पहिल्याच पावसात जर पहिल्यासारखाच होणार असेल तर कोट्यावधी रुपये का खर्च केले.. हा रस्ता बोगसच करायचा होता तर केलाच कशाला ? कोट्यवधी रुपये खर्च न करताच घेऊन जायचे की मग अशा नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया पुढे येत आहे…