16.9 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमची 80 लोटल्यानंतर तू ही असेच करशील का ?

★अजित पवारांच्या बंडखोरीनंतर रोहित पवारांना आई-वडिलांचा प्रश्न!

मुंबई : वृत्तांत

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आणि कुटुंबात कुटुंबात कुणी फूट पाडली हे सर्वांना माहिती आहे. जनता ही गोष्ट विसरणार नाही. आमची लढाई भूमिकेची, अस्मितेची व स्वाभिमानाची आहे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोमवारी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर रोहित पवारांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्या घरी घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी मला आम्हाला 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तू सुद्धा अशीच भूमिका घेशील का? असा सवाल केला. माझ्या पालकांना असा प्रश्न पडला असेल, तर इतरांचे काय? आपल्या कुटुंबावर अशी स्थिती ओढावली तर आपण काय करू, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. भाजपने केलेल्या फोडाफोडीच्या गोष्टी लोकांना पटल्या नाहीत.
भाजपने सूनियोजितपणे खेळ खेळला. त्यांनी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी स्थापन केलेली शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. सध्या देशात भाजपविरोधात वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही बोलू नये, मोठे नेते आपापल्या प्रश्नांत गुंतून रहावेत, यासाठी त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडली, असे रोहित पवार म्हणाले.

★अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न

नाशिकमधील पोस्टरवर अजित पवार यांचा फोटो नव्हता. भुजबळसाहेब बोलत असताना त्यांना सहजपणे बाजूला करण्यात आले. छगन भुजबळांनी सगळे खापर अजित पवार यांच्यावर फोडले. निवडक 4 ते 5 लोक अजित पवार यांना व्हिलन ठरवत आहेत. लोकांना अजित पवारांचा निर्णय पटला नाही. आमचे कुटुंब फोडून भाजप एसी खोलीत बसून मजा पाहत आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

★बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना पार्थ पवारांचे आव्हान? रोहित पवार म्हणाले – अजित पवार तशी भूमिका घेणार नाहीत, पण..!

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले पडली आहेत. अजित पवार व त्यांच्या समर्थकांचा गट सध्या सत्तेत सहभागी झाला आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाने त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे. दोन्ही गट आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत आहे. त्यातच आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे आव्हान मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे 2009 पासून या मतदार संघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. तर उपमुख्यंत्री अजित पवार विधानसभेत या मतदार संघाचे नेतृत्व करतात. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदार संघातील आगामी लढत लक्षवेधक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!