शेतकऱ्यांची लूट थांबवा अन्यथा तोंडाला काळे फासु – गणेश बजगुडे पाटील
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीस खत बी बियाणे विकत घेण्यासाठी बळीराजा बाजारपेठेत गर्दी करत आहे. परंतु खत, बी बियान्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दराने विक्री करत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. खरेदी खताच्या पक्क्या पावत्या न देता बनावट पावत्या दिल्या जात असून याकडे कृषी अधिकारी व महाराष्ट्र शासनाचे सर्वच कृषी खाते नेहमी प्रमाणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केला आहे.
जिल्ह्यातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव आखला असुन जास्तीच्या किमतीत मालाची विक्री करत असल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना शासकीय नमुना बील (पक्क्या पावत्या) दिले जात नाही. तसेच बीड जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खताची विक्री होत असताना आपल्याकडे शेतकऱ्यांना शिल्लक असुन देखील हवे ते बी बियाणे खत मिळत नाही मिळालेच तर ते अवाढव्य किमतीत घ्यावे लागते या सर्व प्रकरणाकडे कृषी अधिकारी जाणीव पुर्वक डोळझक करत आहेत. आश्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना हवा तो माल योग्य किमतीत उपलब्ध करून द्यावा नसता कृषी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासु असा इशारा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी दिला.
[ मदतीसाठी संपर्क : बळीराजाच्या मदतीसाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबध्द असुन मदतीसाठी शेतकऱ्यांनी ९४२१२८१०१२ या नंबरवर माझ्याशी संपर्क साधावा ]