★अंबाजोगाईच्या निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क धडक कारवाई ; आरोपीसह 1,37000 चा मुद्येमाल ताब्यात!
बीड | प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने धाडसी कार्यवाही करत बनावट देशी मद्य व दुचाकी गाडीसह आरोपीला ताब्यात घेतले आसुन १३७०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई यांना सुनिल छबु गायकवाड हा अवैध बनावट देशीदारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या अधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सो संचालक सुनील चव्हाण, सो औरंगाबाद विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली विश्वजीत देशमुख अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक गुरव जी. एन. दुय्यम निरीक्षक रशिद बागवान अंबाजोगाई, व स.दु.नि. एस. के. सय्यद, जवान आर. ए. जारवाल, के. एस. जारवाल, एस.व्ही. लोमटे यांनी सापळा रचून त्यास केज तालुक्यातील बनसारोळा येथून ९ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्या कब्जातून बनावट देशी दारुचे २२ बॉक्स, एक पॅशन प्रो कंपनीची दुचाकी वाहन अशा प्रकारे एकुण रु. १,३७०००/- चा मुद्देमाल पतकाने जप्त केला आहे.पुढील तपास गुरव जी. एन. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई हे करीत आहेत.