19.1 C
New York
Friday, April 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

मतदानावेळी बोटावर शाई नव्हे तर चुना लावा आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

मतदानावेळी बोटावर शाई नव्हे तर चुना लावा आंदोलन – डॉ.गणेश ढवळे

★आयाराम गयाराम संस्कृतीच्या निषेधार्थ पक्षांतर बंदी कायदा कठोर करा मागणीसाठी लक्ष्यवेधी!

बीड | प्रतिनिधी

राज्यातील घडणाऱ्या घडामोडी लोकशाहीसाठी चिंताजनक असुन आमदार, खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात सरकार पाडण्याचे अथवा अस्थिर करण्याचे काम करतात त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्य माणसांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते पर्यायाने राज्याचा विकास खुंटतो त्याच्या निषेधार्थ मतदानावेळी बोटावर शाई ऐवजी चुना लावण्यात यावा आणि आयाराम गयाराम संस्कृतीला आळा घालण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सुधारणा करण्यात येऊन कठोर कायदा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१० जुलै सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक “मतदानावेळी बोटावर शाई ऐवजी चुना लावा”लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल यांना देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे,रामनाथ खोड,शेख मुबीन, शेख मुस्ताक, मिलिंद सरपते,संजय पावले, धनंजय सानप, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे , भिमराव कुटे, प्रदीप औसरमल, प्रदिप औसरमल, विश्वास डोंगरे,प्रविण पवार, किष्किंधाताई पांचाळ आदि सहभागी होते.

★पक्षांतर बंदी कायदा कठोर करा

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींनी पक्ष सोडल्याचे दिसत नसुन स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.१९८५ मध्ये ५२ व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला.याद्वारे घटनेत दहाव्या परिशिष्टाचा समावेश करुन कलम १०२ आणि १९२१ नुसार या आमदारांना ,खासदरांना पात्र ठरवणा-या अनुष्छेदामध्ये बदल करण्यात आला.मात्र सध्याची परिस्थिती विचाराधीन घेऊन आयाराम गयाराम संस्कृतीला आळा घालण्यासाठी आणखी कडक कायदा करण्याची आवश्यकता असुन मतदारांनी दिलेला कौल लोकप्रतिनिधी ज्या पक्षात आहेत त्यांच्यासाठी असतो त्यामुळे निवडुन आल्यानंतर पुढील निवडणुकी पर्यंत पक्ष बदल करता येऊ नये अशी तरतूद करण्यात यावी.जर एखाद्या लोकप्रतिनिधीला पक्ष बदलायचा असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीचा सामना करावा व नविन पक्षात गेल्यानंतर त्या पक्षातर्फे निवडणूक लढवावी अशी तरतूद करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!