★आमदार आजबे,आमदार धस,धोंडेंची डोकेदुखी वाढली पण चौथा पर्याय कोण ?
★आष्टीत उमेदवारीवरून निर्माण होऊ शकतो पेच नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी!
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील होऊन सर्वांनाच धक्का दिला. या मतदारसंघात आ.आजबे यांच्या निर्णयामुळे हाय व्होल्टेज घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आजबे यांच्या या एन्ट्रीमुळे भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस व माजी आमदार भीमराव धोंडे या दोन्ही भाजप नेत्यांची डोकेदुखी निश्चितच वाढल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे काही दिग्गज नेत्यांना नव्याने पुनरागमनाची संधीही मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर उपमुख्यमंत्रिपदी बनलेल्या अजित पवार यांच्या गटात कोणकोणते आमदार सहभागी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे जिल्ह्यातील प्रकाश सोळंके,आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सुरुवातीचे दोन दिवस त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली, मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या मुंबईतील बैठकीस आ.आजबे उपस्थित राहिले. या गटात सहभागी होण्याचे बहुतांश आमदारांचे कारण हे मतदारसंघातील रखडलेली विकासकामे असे असले तरीही याला अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. काही आमदारांना मंत्री व राज्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे आ.आजबे यांनाही सुरक्षित राजकीय भवितव्यासाठी हा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते अशी चर्चा आहे.माजी आमदार दरेकर शरद पवारांसोबत मागील काळात माजी आमदार साहेबराव दरेकर हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असताना अद्यापपर्यंत तरी त्यांची भूमिका समोर आली नाही. त्यामुळे दरेकर हे सध्या तरी शरद पवार गटात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना त्या गटातून संधी मिळू शकते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले मेहबूब शेख हेदेखील शरद पवार यांच्या गटामध्येच आहेत.
* नेते विरुद्ध जनता आष्टीचा राजकारण होणार काय ?
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालतीवरून आष्टी मतदारसंघाचे राजकारण सुद्धा नेत्यांची डोकेदुखी वाढू लागले आहे.. परंतु सर्वच नेते सत्य मध्ये गेल्यानंतर जनते विरुद्ध नेते अशी लढत होईल की काय असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.. येणाऱ्या काळात नेते विरुद्ध जनता असं चित्र पाहायला मिळतंय की काय ? कारण की कोणताच नेता विरोधात उरला नाही… सर्वच सत्य मध्ये बसल्याने असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत..
* परिस्थितीनुसार ऐनवेळी घडामोडी
उमेदवारीवरून पेच निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आमदार धस व माजी आमदार धोंडे यांना काँग्रेस व माजी आमदार धोंडे यांना विशेषतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट असा पर्याय ऐनवेळी समोर येऊ शकतो मात्र सध्या तरी हे नेते या पर्यायाचा विचार करण्याची शक्यता नसून ऐनवेळी जी परिस्थिती असेल त्यानुसार या घडामोडी घडतील तर आमदार धस यांचे व्याही माजी आमदार दरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्नेही म्हणून ओळखले जातात.
* नेत्यांना विधानसभेचे लागले वेध
अजित पवार यांच्या गटात सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांना सुरक्षित भवितव्याची हमी देण्यात आल्याची माहिती आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गट शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवायचे ठरवले व विद्यमान आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायचे ठरले तर आजबे दावा करतील. त्यातच धस यांची विधान परिषदेची मुदत त्याच वेळी संपत असल्याने त्यांनाही वेध लागले आहेत. धोंडे यांना २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी हवी आहे.