डॉ.गणेश ढवळे राज्यस्तरीय मौलाना आझाद समाजसेवा पुरस्काराने सन्मानित!
बीड | प्रतिनिधी
बीड:- दैनिक दिव्य वार्ता आणि सा.कश्मकश यांच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरीय मौलाना आझाद समाजसेवा पुरस्कार १२ व्या वर्धापनदिना निमित्त आज दि.८ जुलै शनिवार रोजी कोहीनूर लॉन्स बीड येथे मोठ्या दिमाखात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी सामाजिक कार्य करताना गोरगरीब, वंचित यांच्या समस्या वैविध्यपूर्ण अनोख्या आंदोलनातुन सोडविण्यासाठी प्रमुख भुमिका घेतल्याने अनेकांना दिलासा मिळाला असुन याची दखल घेत समाज कार्यात दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना प्रसिद्ध शायर अबरार काशिफ,शायर इमरान राशेद , मौलाना शफीक कासमी, हास्य कलाकार असिफ अलबेला, संपादक मोहंमद अबु बकर यांच्या शुभहस्ते व शोएब खुसरू, सर्फराज अहमद, भागवत तावरे,सलिम जहांगीर यांच्या उपस्थितीत सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.