स्टेट बँकेतील एजंटांना हटवा!
★आष्टा हरिनारायण परिसरातील ग्रामस्थांची मागणी
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण या गावांमध्ये भारतीय स्टेट बँकेची शाखा असून या शाखे अंतर्गत आष्टा आंधळेवाडी मातकुळी चिंचपूर मातावळी करेवडगाव करेवाडी भातोडी अशा गावांचा समावेश आहे खरीप पिक कर्ज मंजुरीसाठी व इतर कामासाठी या शाखेमध्ये एजंट लोकांचा वावर बँकेतील अधिकारीही एजंट मार्फत येणारी प्रकरणी तात्काळ मंजूर करून देतात या एजंट लोकांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून जसे प्रकरण असेल तशा प्रकारची रक्कम एजंटामार्फत घेतली जाते बँकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ एजंटामार्फत येणारे प्रकरण बंद करून सर्वसामान्य ग्राहकांना न्याय द्यावा नसता आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महादेव महाजन यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की भारतीय स्टेट बँक शाखा आष्टा हरिनारायण येथे कोणत्याही साध्या कामासाठी सुद्धा एजंटामार्फत काम करावे लागते त्यामुळे या बँकेमध्ये कामकाज नेमके कर्मचारी करतात की एजंट करतात हेच कळेनाशी झाले आहे सर्वसामान्य जनतेला काम लवकर व्हावे यासाठी ते नाईलाजाने एजंट मार्फत काम करून घेतात अनेक वेळा हेलपाटे मारूनही बँकेचे अधिकारी कसलीही दात देत नाहीत उडवाउडविचे उत्तर देऊन टाळाटाळ केली जाते परंतु एजेंटामार्फत ते काम दोन दिवसात मार्गे लागते त्यासाठी सर्वसामान्य लोकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, हे सर्व थांबवण्याची वारंवार विनंती संबंधित अधिकाऱ्यांना केली असतांना देखील बँकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत बँकेतील एजंट गिरी तात्काळ थांबवावी नसता आष्टी तहसील समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महादेव महाजन व आष्टा चिंचपूर मातकुळी ग्रामस्थांनी दिला आहे.