12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘तू एकटी आहेस का? कुठे राहतेस? मोबाइल नंबर दे!’

‘तू एकटी आहेस का ? कुठे राहतेस ? मोबाइल नंबर दे !’

* महिलेची छेड काढणारा सराईत गुन्हेगार रिक्षाचालक अटकेत

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

तू एकटी आहेस का? कुठे राहतेस? तुझा मोबाइल नंबर दे, अशी मागणी करत प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी चार ते साडेचारदरम्यान कार्तिकी सिग्नल ते बाबा पेट्रोल पंपादरम्यान घडला. महिलेने समयसूचकता दाखवत रिक्षाचा फोटो काढून थेट पोलिस ठाणे गाठले. क्रांती चौक पोलिसांनी तातडीने तपास करत रिक्षाचालकाला दोन तासांत अटक केली.तपासात तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. एमएच २० ईएफ १७४० असा रिक्षाचा क्रमांक असून शेख वसीम शेख सलीम (२६, रा. सब्जीमंडी) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. प्राची (नाव बदलले आहे) या समर्थनगर येथून सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाल्या. कार्तिकी सिग्नलवरून त्या रिक्षात बसल्या. तेव्हा प्राची यांना एकट्या पाहून रिक्षाचालकाने त्यांच्याशी बोलणे सुरू केले. मोबाइल नंबरची मागणी करत अंगाला स्पर्श केला. बाबा पेट्रोल पंप येथे दोन महिला प्रवासी बसल्याने त्याने बोलणे बंद केले. नंतर तो प्राची यांच्याकडे पाहू लागला. प्राची नगर नाका येथे रिक्षातून उतरल्या. तरीही रिक्षाचालक त्यांच्याकडे डोकावून पाहत होता.

* रेकॉर्डिंग करा, ११२ नंबरवर संपर्क साधा

रिक्षात छेडछाडीचे प्रसंग घडल्यास मोबाइलमध्ये व्हिडिअो शूटिंग करा किंवा किमान रेकॉर्डिंग करा. तत्काळ ११२ किंवा ०२४०– २२४०५०० क्रमांकावर फोन करून माहिती द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

* समयसूचकतेने काढला फोटो

प्राची यांनी रिक्षातून उतरताच रिक्षाच्या नंबरचा फोटो काढला अन् थेट छावणी पोलिस ठाणे गाठले. तेथील पोलिसांनी आमची हद्द नाही, असे सांगत क्रांती चौक पोलिस ठाण्यात पाठवले. तेथे पोहोचताच पोलिस उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी नंबरवरून रिक्षाचा शोध सुरू केला. प्राची यांनी रात्री साडेआठ वाजता तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री १०.१४ वाजता चालक वसीमला अटक केली. त्याच्यावर सिटी चौक, जिन्सी, क्रांती चौक पोलिस ठाण्यात सहा गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!