★जिल्हाप्रमुखाच्या पदासाठी सुशील पिंगळे,व्यंकटेश शिंदे,विनायक मुळे चर्चेत!
![]()
![]()
पाटोदा | प्रतिनिधी
शिवसेनेचे नवनिर्वाचित बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांची जिल्हाप्रमुख पदावरून हाकलपट्टी करण्यात आले आहे. केस तालुक्यातील कला केंद्रावर कला पोलिसांनी धार टाकली या केंद्रावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर या प्रकरणी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पक्षाने याची तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे..
बीड मधील महाप्रबोधन यात्रेत तात्कालीन जिल्हाप्रमुख जाधव व शिवसेनेच्या नेत्या अंधारे यांच्यात वाद झाल्यानंतर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकलपट्टी करण्यात आली होती त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी केज येथील रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती झाली होती. या निवडीला दोन अडीच महिनेच होत नाही तोच काल पोलिसांनी उमरी शिवारातील कला केंद्रावर छापा टाकून काही मुलींना ताब्यात घेतले होते या प्रकरणी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने याची दखल घेत त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून शिंदे यांची हकालपट्टी केली आहे..
* नवीन जिल्हाप्रमुख पदासाठी पिंगळे, शिंदे, मुळे यांचे नाव चर्चेत!
केस तालुक्यातील उमरी येथील कला केंद्र छापाप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकलपट्टी झाली यानंतर आता शिवसेनेचा नवीन जिल्हा प्रमुख कोण ? याबाबत चर्चा रंगत आहेत सध्या या पदासाठी उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे वडवणी चे तालुकाप्रमुख विनायक मुळे यांचे नाव चर्चेत आहेत.. शिवसेनेला उभारी देण्यासाठी या नावाचा विचार केला जाऊ शकतो आता जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी पक्ष कोणाकडे देतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..