पाटोद्याचे भूमिपुत्र ॲड.नरसिंग एल.जाधव खंडपीठाच्या वकील संघाच्या अध्यक्षपदी!
★प्रलंबित खटल्याचा जलद निपटारा न्यायमूर्तीच्या रोटेशनला प्रधान्य – ॲड.नरसिंग एल.जाधव
पाटोदा | प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल प्रकरणाचा जलद गतीने निपटा राहावा यासाठी जास्तीत जास्त न्यायमूर्ती व पिठांतून रोटेशन ने औरंगाबाद खंडपीठात येतील याला प्राधान्य देणार असल्याची नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.नरसिंग एल.जाधव यांनी सांगितले खंडपीठ वरील संघाच्या निवडणुकीत जाधव यांना 574 मते मिळाली. त्यांनी ॲड. बलभीम केदार यांचा 58 मतांनी पराभूत केला. अनेक वर्षापासून वकील संघाचा अध्यक्ष होण्यासाठी ॲड.नरसिंग एल.जाधव प्रयत्नात होते या निमित्ताने त्यांची इच्छा पूर्ण झाली..
सचिव पदी राधाकृष्ण इंगोले 469 मते घेत विजयी झाले. लायब्ररी समितीच्या चेअरमन पदासाठी तिरंगी लढतीत ॲड. प्रशांत बोराडे 549 मते मिळवत विजयी झाले.ॲड. कविता भाले यांना 461 तर ॲड. चेतन जाधव यांना केवळ 157 मते मिळाल्याने ते पराभूत झाले. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.नरसिंग एल.जाधव यांचे मावळते अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी व सचिव ॲड. सुहास उरगुंडे यांनी स्वागत केले..
* 1100 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क!
अकराशे पेक्षा जास्त मतदारांनी निवडणुकीत मतदान केले मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. प्रल्हाद बचाटे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. विष्णू मदन पाटील, ॲड. ललिता महाराज, ॲड. ज्ञानेश्वर बागुल, ॲड. अमरजीतसिंह गिरासे, ॲड. योगिता शिरसागर थोरात, ॲड. रश्मी गोरे, ॲड. सुवर्णा झावरे यांनी सहाय्य केले तीन पदांव्यतिरिक्त इतर पदांसाठी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली..
* ॲड.जाधव यांचा येणाऱ्या काळातील अजेंडा!
1) खंडपीठ वकील संघाच्या वतीने कनिष्ठ वकिलांना उर्वरित लॉयर्स चेंबर मिळवणे..
2) नवीन प्रशासकीय इमारत सुरू करणे..
3) वकिलांना सुविधा मिळवून देणे..
4) वाहनांसाठी पार्किंगची सुविधा प्रदान करणे..
यासह अनेक मुद्द्यावर त्यांचं लक्ष केंद्रित असणार आहे..
* पाटोद्याच्या भूमिपुत्राचा खंडपीठात धबधबा वाढला!
पाटोद्याचे भूमिपुत्र ॲड.नरसिंग एल.जाधव हे नेहमीच नागरिकांच्या सर्व प्रश्नावर आवाज उठवत आले आहेत हक्काने त्यांच्याकडे नागरिक आपले कामे घेऊन जातात त्यांच्या सर्व अडचणीचं सोलुशन देखील त्यांच्याकडे मिळतं असा पाटोद्याचा भूमिपुत्र संभाजीनगर च्या खंडपीठात आता महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने पाटोद्याच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे…आमचे ॲड.नरसिंग एल.जाधव खंडपीठात वकील संघाचे अध्यक्ष झाले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा प्रतिक्रिया पाटोदा तालुक्यातून येत आहेत..