महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून विकास करावा,सावता सेना संघटनेची मागणी
आष्टी | प्रतिनिधी
कर्म हिच भक्ती आणी त्यातुन मिळालेले यश म्हणजे ईश्वर प्राप्ती असा विज्ञान वादी संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथील तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित राहीले आहे.तरी महाराष्ट्र शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून विकास करावा अशी मागणी संत सावता सेना संघटनेचे आष्टी तालुकाध्यक्ष तुषार बोरुडे यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्य़ातील अरण हे सावता महाराज यांचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी भाविक भक्त मोठ्याप्रमाणे दर्शनासाठी येत असतात. पंढरपूर यात्रेच्या वेळी गावगावच्या दिंड्या विठ्ठलाच्या भेटीला पंढरपूरला जातात.मात्र अरण येथे साक्षात पांडुरंगाची दिंडी संत सावता महाराजांच्या भेटीसाठी येते ही बाब याठिकाणी वैशिष्ट्य पुर्ण आहे.त्यामुळेच या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहीजे.तसेच शासन इतर तीर्थक्षेत्राच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून देत आहेत. मात्र अरण येथील तीर्थक्षेत्रास अध्याप विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे.त्यामुळे आता तरी या तीर्थक्षेत्राच्या विकासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी द्यावा अशी मागणी सावता सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सावता सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना भेटून मागणी करणार आहेत. भरीव निधी बरोबरच तीर्थक्षेत्राचा विकास करावा.संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजा करण्यात यावी अरणला संतपिठाचा दर्जा द्यावा,येथे विकास प्राधिकरण स्थापन करून विकास निधीची तरतूद करण्यात यावी असी मागणी तुषार बोरुडे यांनी केली आहे.