अठ्ठेगाव-पुठ्यात अधिकारी होण्याची रेलचेल!
* शेतकऱ्याची मुलगी झाली पीएसआय ; मनीषा महादेव केकानची गगनभरारी !
* मुगगाव सह परिसरातील सर्वच गावांमधील नागरिकांकडून मनीषा च्या पाठीवर कौतुकाची थाप!
* मराठी पत्रकार परिषदेकडून देखील सन्मान व लेखणीतून तिच्या संघर्षाला उजाळा!
पाटोदा | सचिन पवार
वडील शेतीमध्ये राबराब राबवून आणि कित्येक वर्ष ऊस तोडून कष्ट करत आपल्या लेकी साठी शिक्षणातून भविष्य पाहणाऱ्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचे अखेर स्वप्न साकार झाले कन्या कु. मनीषा फौजदार झाल्याने तिने आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. या पूर्वी चार महिन्यात एक पोलीस उपअधीक्षक, एक कामगार उपायुक्त व दोन फौजदार या परिसरात झाले आहेत .
पाटोदा तालुक्यातील अठेगाव पुठ्ठ्यातील मुगगाव या गावातील मनीषा महादेव केकान हिने 2020 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला याच्यामध्ये मनीषा महादेव केकान हिची फौजदार पदी निवड झाली आहे. मनीषाचे वडील महादेव केकान हे अत्यंत सामान्य शेतकरी आहेत ऊसतोड करून व शेतीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे उप जीविका भागवतात, मुलीला शिकवण्याची त्यांची प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द होती या जिद्दीला आज फळ प्राप्त झाले आहे, असे तिचे वडील महादेव केकान लोकमत शी बोलताना म्हणाले मनीषा ही मुगगाव येथील रामचंद्र धस महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे तिने जिद्द कष्ट आणि मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यश संपादन केले आहे या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर भवर सर, महाविद्यालयाचे संस्थाप्रमुख सरपंच संजय खोटे, महावीर गजधने सर, संतोष खोटे सर, माणिक वरात सर, महादेव वराट सर, रवींद्र तांबारे, गहीनाथ गोरे, शेषराव भवर, माजी सरपंच रवींद्र केकान, आबा केकान सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
* आर एन डी ची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान!
मनीष काकांनी अत्यंत सामान्य घराची विद्यार्थिनी आहे आर एन डी महाविद्यालयत अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाने आणि मेहनतीच्या बळावर तिने अभ्यास केला. तिची झालेली फौजदार पदी निवड आमच्या महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे कौतुक उद्गार प्राचार्य ज्ञानेश्वर भवर यांनी व्यक्त केले…
* काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगा यश मिळेल – मनीषा केकान
कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही मग त्याला कष्ट जिद्द चिकाटी ठेवून कार्य करावे लागते. तसंच विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासामध्ये जिद्द चिकाटी आत्मविश्वास ठेवून अभ्यास करावा आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत नक्कीच यश तुमच्या कडे धावून आल्याशिवाय राहणार नाही फक्त हार मानू नये तुमच्यापाशीच आहे..
– मनीषा केकान
नवनिर्वाचित पीएसआय..
* मराठी पत्रकार परिषदेकडून मनीषा केकान चा सन्मान!
मराठी पत्रकार परिषद नेहमीच सामाजिक कार्याबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत लेखणीतून त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. आट्ठेगाव पुठ्ठ्यातील मनीषा केकान एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश तितकच अभिमानास्पद आहे, तिच्या कार्याला तिच्या संघर्षाला सलाम करत लेखणीतून मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वच पत्रकारांनी उजाळा दिला आहे, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सन्मान देखील केला आहे.