भाऊसाहेब अण्णाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला संपूर्ण अंमळनेर सर्कल!
* अंमळनेर सर्कल मधील जनतेचे प्रेम आणि जनतेचा विश्वास म्हणजे भाऊसाहेब भवर
* मुगगाव मध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भवर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
* भवर अण्णांचा वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप गुणवंतांचा सत्कार वृक्षारोपणातून साजरा
पाटोदा / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आ.सुरेश आण्णा धस यांचे समर्थक अंमळनेर सर्कलचे नेतृत्व भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुगगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अंमळनेर सर्कल मधील नेते मंडळी सह सरपंच, सदस्य, कार्यकर्ते, मित्रपरिवार, सर्वसामान्य नागरिक, गावची गावे शुभेच्छा देण्यासाठी मुगगाव येथे एकच गर्दी केली होती.एक प्रकारे मुगगावमध्ये भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याची जत्रा भरली होती.. आष्टी मतदार संघाची युवा नेते जयते भैय्या धस यांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ओपन आणि शालेय साहित्य असं वाटप करण्यात आले ..
भाजपा जेष्ठ नेते,आ.धस अण्णा समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अमळनेर सर्कल मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी मुगगाव येथे गर्दी केली होती. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आलेल्या सर्व नागरिकांसाठी जीवनाचा व्यवस्था करण्यात आली होती.. आलेल्या नागरिकांमधून एकच कुजबूज सुरू होते की पुढचा अंमळनेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब अण्णा भवरच होणाऱ्या तीळ मात्र शंका उरली नाही… नागरिकांना एकत्रित करण्याची क्षमता आणि टिकून ठेवण्याची ताकद फक्त भाऊसाहेब अण्णा भवर मध्येच आहे, त्यांच्या या कर्तुत्वावर संघटनशील प्रयत्नामुळे येणाऱ्या काळात अमळनेर सर्कलच्या सर्व धुरा भाऊसाहेब अण्णांच्या हाती येतील यातही शंका उरली नाही.. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे युवा नेते जयदत्त भय्या धस, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास आबा धस यांच्यासह अंमळनेर सर्कल मध्ये प्रत्येक गावचे सरपंच सदस्य नागरिक युवा वर्ग कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
* भाऊसाहेब अण्णांचा वाढदिवस उद्याच्या विजयाची नांदी!
अमळनेर सर्कलच्या विजयाची नांदी म्हणजेच भाऊसाहेब अण्णा भवर यांचा अभिष्टचिंतन सोहळा.. गाव येथे संपन्न झालेला भाऊसाहेब अण्णा भवर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पाहून कार्यकर्ते ज्येष्ठ नेते युवावर्ग हितचिंतक यांच्या तोंडी एकच वाक्य आहे ते म्हणजे अमळनेर सर्कलचे भाग्यविधाते आणि विजयाची नांदी ठरणारा नेता म्हणजे फक्त भाऊसाहेब अण्णा भवरच आणि हा झालेला त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे, यातील मात्र शंका उरलेली नाही फक्त आता शिक्का मुहूर्त होणे बाकी उरले आहे.
* नेत्याची आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम हीच माझी ताकद – भाऊसाहेब भवर
आमचे नेते आमदार सुरेश आण्णा धस यांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम हीच माझी ताकद आहे. नेत्याच्या आशीर्वादाने जनतेच्या सुखदुःखात धावून जाण्याची परंपरा आम्ही कायम सुरू ठेवली आहे त्यामुळेच जनतेचे प्रेम आम्हाला अधिक मिळत आहे तेच प्रेम कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सर्व अडचणी सोडवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे आणि भविष्यात जनतेला कोणतीच अडचण येणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू..
– भाऊसाहेब अण्णा भवर
ज्येष्ठ नेते भाजपा अंमळनेर सर्कल..