तेलगावातुन चोरीस गेलेल्या कारचा पडदा फास ; एलसीबी व दिंद्रुड पोलिसांची कामगिरी
बीड | प्रतिनिधी
तेलगाव येथील शिक्षक श्रीराम आपेट यांच्या चोरीस गेलेल्या स्वीप्ट डिझायर कारचा बीड स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व दिंद्रुड पोलीसांनी गतीने तपास करून केवळ महिन्याच्या आतच सदरील कार जप्त करत आरोपीच्या मुसक्या आवळत त्यास गजाआड केले.याबद्दल पोलीस यंञणेचे सर्वञ अभिनंदन होत आहे.तरी धारूर न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
यासंदर्भात माहिती अशी की,तेलगाव ता.धारूर येथील शिक्षक श्रीराम अनिरुद्ध आपेट यांची घरा समोर लावलेली स्वीप्ट डिझायर कार क्र.एच.एच.१३ डी.ई.४०६२ ही गाडी दि ११ जुन रोजी तेलगाव येथे धारूर रोड परिसरातील घरासमोर लावलेली असताना त्या राञी चोरट्यांनी सदरील गाडी चोरली.सदर गाडी चोरी झाल्यापासूनच दिंद्रुड पोलीस व बीड स्थानिक गुन्हे शाखा तपास करत होते. त्यातच दि ४ जुलै रोजी गुप्त खबऱ्या मार्फत पोलीसांना ही गाडी जालना येथे एका घरासमोर उभी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, स्थानिक गुन्हे शाखाचे नुतन पोलीस निरीक्षक संतोष साबळे व दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अण्णासाहेब खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दिंद्रुड पोलीसाचे संयुक्त पथक जालन्याच्या दिशेने रवाना झाले.तेथे गेल्यावर पोलीसांनी मोठ्या शिताफीने धडप घालुन उभ्या असलेली गाडी ताब्यात घेतली.यावेळी गाडीत शेख नदीम शेख दाउत हा सापडला.पोलीसांनी त्यास विचारणा केल्यावर त्याची बोबडी वळली.त्यानंतर त्याने सदर गाडी तेलगाव येथुन चोरल्याची कबुली देत आपल्यासह अन्य दोघे असल्याचीही कबुली दिली.ते दोघे फरार असुन त्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांना ही गजाआड करू असे पोलीसांनी म्हटले.त्यानंतर गाडीसह सदरील आरोपीस दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.या तपास कामी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखेचे पीएसआय तुलक, एएसआय. जगताप,मुन्ना वाघ, विकास वाघमारे, चालक कदम ,आंधळे तसेच दिंद्रुड ठाण्याचे अनिल भालेराव, रेवन दुधाने होते.सदर आरोपीस गुरूवारी दुपारी धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.केवळ एका महिन्याच्या आतच पोलीसांनी गाडी चोरीचा तपास करून आरोपीस अटक केल्याबद्दल दिंद्रुड व एलसीबी पोलीसांचे अभिनंदन होत आहे.