महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यातील नेतेमंडळी बरी ; सोशल मीडियावर मतदारांच्या तीव्र भावना
नेतेमंडळी हो! तुम्ही आता पक्ष बदलू नका ; आम्हीच मतदान कार्ड विक्रीला काढले
नेतेमंडळीच्या गलिच्छ राजकारणामुळे ; मतदारांनी काढले मतदान कार्ड विक्रीला!
महाराष्ट्राची संस्कृती नेतेमंडळीमुळे बिघडत चालली राजकारण्यांचा चुकीचा पायंडा!
पाटोदा / सचिन पवार
- मागील काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात खराब वातावरण झाल्याने मतदार चक्क वैतागलेले पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावर राग व्यक्त करताना सुद्धा दिसत आहेत तर आता चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. शिवसेना आणि आता राष्ट्रवादीच्या फुटी मुळे मतदारांनी चक्क मतदान कार्ड विकलेला काढल्याच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रातील नेत्यांचा काहीच भरोसा राहिला नसल्याने सोशल मीडियावर मतदारांनी चक्क मतदान कार्ड विक्रीला आहे अशा पोस्ट सुरू केल्या आहेत. ही मनोरंजनाची किंवा टाइमपासची बाब नसून महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालल्याची संधी देणारी आहे. सर्व नेतेमंडळीवरील विश्वास उडाल्याने आता मतदान करायचं नाही त्यामुळे आमची मतदान कार्ड विक्रीला काढले असल्याच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवायचा हाच प्रश्न मतदारांसमोर उभा आहे त्याचबरोबर त्यांना आपण मतदान करतो तो किती दिवस त्या पक्षात राहील याची शाश्वती मिळत नसल्याने मतदार मोठ्या निर्णयावर येऊन ठेपले आहेत. नेतेमंडळींनी आता फुटाफुटीच्या भानगडीत न पडता आम्ही आमचे मतदान कार्ड विक्रीला काढले आहेत कोणत्याही पक्षाने आमचे मतदान विकत घ्यावेत आणि स्वतःचे मतदान फिक्स करून घ्यावेत म्हणजे आम्हालाही त्रास होणार नाही आणि तुम्हालाही त्रास होणार नाही अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेतेमंडळीची मतदारांनी अब्रूच काढली म्हणावं लागेल यातील मात्र शंका उरली नाही.
नेतेमंडळीला कंटाळून मतदारांनी मतदान कार्ड काढले विक्रीला!
महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारीचा कहर मतदार संभ्रमात पडले आहेत आपण मतदान कोणाला करायचं तो किती दिवस त्या पक्षात राहील तो काय कामे करेल त्याला सर्वसामान्यांची जाण आहे का असे अनेक प्रश्न मतदारांनी आता या सर्व गोष्टीला सारथ स्वतःचे मतदान कार्ड विक्रीला काढल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत..
नेत्यांचा काय भरोसा नाय!
शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षासोबत केलेलं बंड हे महाराष्ट्राला हादरा देणार आहे. नेत्यांवरचा भरोसा कार्यकर्त्यांचा पूर्णपणे उडाला आहे. आता निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता म्हणण्याची वेळ पूर्णपणे निघून गेली आहे. नेतेच निष्ठावंत राहिला तयार नाहीत मग कार्यकर्त्यांनी निष्ठावंत, एकनिष्ठ, सच्चा कार्यकर्ता कसं तयार व्हायचं! नेतेमंडळींनी केलेलं बंड हे कार्यकर्त्यांना खूप काही सांगून जाणार आहे. आता कार्यकर्त्यांनी नेत्याकडूनच काहीतरी शिकलं पाहिजे तरच तुम्ही या राजकीय विठ्ठल अन्यथा तुम्ही सुद्धा वाऱ्यासोबत पाचोळ्यासारखं उडून जातात यातही तीळ मात्र शंका उरलेली नाही.
सोशल मीडियाचा नेत्यापेक्षा मतदार घेऊ लागला जास्त उपयोग!
आज पर्यंत सोशल मीडियाचा नेतेमंडळ यांनी खूप उपयोग घेतलेलं आपण पाहायला मिळालं. भाजपने तर सोशल मीडियाच्या जीवावर सत्ता देखील काबीज केली त्यात सोशल मीडियाचा वापर मतदार आता करू लागला आहे. सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे हे मतदारांना कळाल्याने त्याचा पूर्णपणे वापर करताना मतदार दिसत आहे. मी त्यांना धारेवर धरण्याची आणि त्यांची लायकी दाखवून देण्याची सोशल मीडियामध्ये ताकद असल्याने मतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्णपणे नेतेमंडळीची अमृतवाट्यावर बांधताना दिसत आहे. बसा बोंबलत नेतेमंडळी हो तुमच्या कर्माचे फळ सोशल मीडियातून तुम्हाला मिळत आहेत.
महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या राज्यातील नेते बरे : महाराष्ट्रातील जनतेच्या भावना
महाराष्ट्रात एक संस्कृत राजकारण आज पर्यंत पाहायला मिळाला परंतु मागच्या काही वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील राजकारण त्यात झालेले देखील पाहायला मिळत आहे. मापक्ष निष्ठाना नीतीनिष्ठा फक्त राहिली ती पैशाची निष्ठा आणि स्वार्थी पदाची निष्ठा. जो पक्ष पैसा देईल पद देईल त्याच्याकडेच आमचा नेता धावत जाईल.. अन्यथा जनता ही गेली वाऱ्यावर असंच म्हणावं लागेल.. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नेतेमंडळींनी चांगलीच दिंडवडे काढले आहेत यातही शंका उरली नाही.