जागराण गोंधळ आंदोलन ; अन्यायाला वाचा फोडण्यासाठी – बाळासाहेब गायकवाड
★ आजच्या न्याय हक्काच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, शासकीय योजनांमधील अपयश, बोगस कामे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार, ता. २६ जून रोजी ‘जागरण गोंधळ आंदोलन’ छेडण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटोदा येथून सुरू होणारा हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे आणि जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
पाटोदा तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत झालेले भ्रष्टाचार अनियमित कामे राजकीय योजनेत अधिकाऱ्यांचं अपयश बोगस कामे विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनातून झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आणि जनतेला त्यांच्या हक्काचे मिळून देण्यासाठी हे आंदोलन असणार आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे..
★आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मागण्या
पाटोदा तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार, बोगस कामे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सामान्य जनता, विशेषतः गोरगरीब आणि दलित समाज त्रस्त आहे. या आंदोलनातून वंचित बहुजन आघाडीने खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
1) जमिनींचे नियमितीकरण
पोटखराब झालेल्या जमिनींचे नियमितीकरण तातडीने करण्यात यावे.
2) बोगस रस्त्यांची चौकशी : शंभर चिरा ते सरकारी दवाखाना, पाटोदा येथील बोगस रस्त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
3) घरकुल योजनेतील भ्रष्टाचार : घरकुल योजनेत कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या इंजिनिअरांकडून जिओ टॅगिंगसाठी गोरगरिबांकडून प्रत्येक हप्त्यासाठी २,००० रुपये घेतले जातात. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पैसे कुठे जातात याचा तपास करावा.
4) घरकुल योजनेचे हप्ते : प्रधानमंत्री आणि रमाई घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर वितरित करावेत.
5) सामाजिक योजनांचे लाभ : संजय गांधी, श्रावण बाळ आणि निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन वेळेवर मिळावे.
6) वाळू वितरण : घरकुल लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार ५ ब्रास वाळू विनामूल्य द्यावी.
7) बोगस कामांवर कारवाई : ग्रामसडक योजनेतील बोगस कामे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोगस रस्त्यांची चौकशी करून दोषी अभियंते आणि ठेकेदारांवर कारवाई करावी.
8 ) पांदन रस्ते आणि बोगस विहिरी : पांदन रस्ते, बोगस विहिरी आणि दलित वस्तीतील कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
★आंदोलनाचे स्वरूप
हे आंदोलन शांततामय पद्धतीने परंतु ठामपणे आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणारा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असून, यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर केले जाईल. आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचाही सहभाग अपेक्षित आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अजय सरवदे , उपाध्यक्ष सचिन मेगडंबर हे करत आहेत…
★सामाजिक प्रभाव
या आंदोलनामुळे तालुक्यातील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय निष्क्रियतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः गोरगरीब आणि दलित समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे सामान्य जनतेत असंतोष आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामुळे या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे.
★आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष!
पाटोदा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेले ‘जागरण गोंधळ आंदोलन’ हे सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. येत्या बुधवारी ता. २६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ता कुसळंब.