24.2 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्हा रुग्णालयात सहा महिन्यात दोन लाख रुग्णांनी घेतले उपचार

  1. अडीच लाख लॅब टेस्टिंग, पाच हजार शस्त्रक्रिया तर एकोणीस हजार जणांची सोनोग्राफी

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णावर चांगले उपचार होत असल्याने जिल्हा रुग्णालयावर विश्वास ठेवत गोरगरीबासह मोठ्या घराण्यातील रुग्ण सुद्धा आता जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या आणि सगळ्यात मोठ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत होत आहेत.जिल्हा रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने जिल्हा रुग्णालयात गेल्या सहा महिन्यात दोन लाख रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद झाली आहे. रुग्ण संख्या वाढलेली आहे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे हे स्वतः प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष देत असल्याने लोकांचा विश्वास वाढत आहे, खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता सरकारी दवाखान्यातच लोक उपचार घेऊ लागले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत अवघड शस्त्रक्रिया, गोरगरिबांना व्यवस्थित उपचार व रुग्णसेवा देत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आर एम ओ डॉ. संतोष शहाणे, डॉक्टर राम आव्हाड, सर्जन डॉ शेख माजेद, डॉक्टर वाघमारे, भूलतज्ञ डॉ.शाफे, अस्थिरोग तज्ञ डॉ.विजय कट्टे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. प्रवीण देशमुख, स्त्री रोगतज्ञ डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर पूनम लोद, डॉ फरीदा मॅडम डॉ. परवीन मॅडम. जिल्हा रुग्णालयाच्या अधि सेविका मेट्रन रमा गिरी व त्यांच्या सर्व स्टाफ यांनी गेल्या सहा महिन्यात अनेक विभाग मार्फत रुग्णावर उपचार करत रुग्णसेवा देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ओपीडी बेसवर एक लाख ९२ हजार ५३३ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यातील ५९ हजार ४२ ऍडमिट झाले. ऍडमिट झालेल्या रुग्णांपैकी ४९६९ रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. १८९३१ रुग्णाची सोनोग्राफी केली. ५७४१ जणांची ईसीजी केली, २१४१ रुग्णांचा सिटीस्कॅन केला. गेल्या सहा महिन्यात ५४४४ जण कुत्रा चावला म्हणून उपचार घेतले. ११६ जणांना सर्पदंस झाल्याची नोंद, जिल्हा रुग्णाच्या रक्तपुरवठा विभागात सहा महिन्यात चार हजार सहाशे सत्तावीस जणांनी रक्तदान डोनेट केले. जिल्हा रुग्णाच्या लॅब मध्ये दोन लाख ४९ हजार ८१० रुग्णांच्या रक्ताची नमुना चाचणी झाली. तर अपघात विभागात एम एल ची तीन हजार १०० झाल्याची नोंद आहे जिल्हा रुग्णाच्या प्रस्तुती विभागात ४१७६ महिलांनी सुखरूप बाळांना जन्म दिला तर १५६८ रुग्ण माताची सिजर करण्यात आले. नेत्र विभागात आठ हजार ३२ वयोवृद्ध असणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर गेल्या सहा महिन्यात बीड जिल्हा रुग्णालयात ३०२ जणांचा अपघातात आणि उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाला. बीड जिल्हा रुग्णाची कर्मचारी संख्या पाहता ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!