राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची सांत्वन भेट!
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील संतोष पवार यांना पितृषोक झाल्याने राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नुकतीच सांत्वन भेट दिली.
कुसळंब येथील संतोष पवार हे सध्या नोकरी निमित्त पुणे येथे स्थायिक आहेत त्या ठिकाणी सर्वच राजकीय नेत्यांची जवळचे संबंध असल्याने त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे खडकवासला संघटक म्हणून काम करण्याची पक्षाकडून संधी मिळाली. वरिष्ठ नेत्यावर देखील त्यांचे चांगले संबंध असल्याने अनेक वरिष्ठ नेत्यांकडून संतोष पवार यांना पितृशोक झाल्याचं समजतात भेटीही दिल्या आणि अनेकांनी फोन करून सांत्वन व्यक्त केले काल नुकतीच राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घरी सांत्वन भेट देऊन कुटुंबाला धीर दिला आहे यावेळी गावातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.