16.7 C
New York
Friday, May 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रत्येक सोमवारी व गुरुवारी भरणार तहसीलचा जनता दरबार!

प्रत्येक सोमवारी व गुरुवारी भरणार तहसीलचा जनता दरबार!

★जनता दरबार मध्ये सर्व जनतेच्या प्रश्नाचं निराकरण होणार : तहसीलदार दत्तात्रय निलावड

पाटोदा | सचिन पवार

शासनच घेऊ लागलं जनतेच्या प्रश्नाची दखल. पाटोदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आता जनता दरबारच्या माध्यमातून प्रश्न मांडता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून सर्व तहसीलदारांना आदेशित केले आहे. पाटोदा तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दर सोमवारी व गुरुवारी जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या जनता दरबार मध्ये सर्वसामान्य जनतेने सहभाग नोंदवून आपले प्रश्न घेऊन यावेत त्याचं निराकरण करण्यात येईल असे तहसीलदार दत्तात्रय निलावड यांनी सांगितले आहे.
प्रत्येक सोमवार व गुरुवारी जनता दरबारच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर जनता दरबार हा तहसील कार्यालय पाटोदा येथील बैठक हॉल मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 02/06/2025 रोजी ठीक दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत महसूल विषयी उपस्थित जनतेचे प्रश्न समजावून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे त्यामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व जनतेने या जनता दरबार मध्ये आपले समस्याचे निराकरण करण्याकरिता नमूद वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान तहसीलदार दत्तात्रय निलावड यांनी केले आहे.

★जनतेचे सर्व प्रश्न जनता दरबार मध्ये सुटणार

सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तयार होत असल्याचा दिसून येत आहे. जनतेच्या समस्या आता ऐकून घेण्यासाठी जनता दरबार सुरू झाला आहे. सर्वसामान्य जनतेने जर प्रतिसाद दिला तर जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लागतील असेही तहसीलदार साहेबांकडून सांगण्यात आल आहे. हा जनता दरबार जनतेसाठीच आहे आणि जनतेचाच आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नमूद वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!