18.5 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्षपदी कुलदीप पवार यांची निवड

★युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व मराठवाडा अध्यक्ष कुंदन काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

पाटोदा | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी पाटोदा तालुका अध्यक्षपदी कुलदीप पवार यांची निवड जाहीर केले असून निवडीचे नियुक्तीपत्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व राष्ट्रवादी विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष कुंदन काळे यांच्या हस्ते देऊन त्यांचा स्वागत केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..
आष्टी–पाटोदा–शिरूर मतदार संघात पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत या बैठकीमध्ये नवीन युवकांना देखील संधी देण्याचे काम करण्यात आलं. पाटोदा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्षपदी कुलदीप पवार यांची निवड करून नवीन युवकांना पक्षात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. उर्वरित राहिलेल्या पदावर देखील लवकरच निवडी जाहीर होणार असून निवडणुकीच्या आधी युवकांना पक्षांमध्ये संधी देऊन सक्रिय करण्याचा संकल्प जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आखला असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये युवकांना देखील संधी देण्याचा मानस असल्याचा दिसून येत आहे. पाटोदा येथे झालेल्या बैठकीमध्ये युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व राष्ट्रवादी विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष कुंदन काळे यांच्या उपस्थितीमध्ये कुलदीप पवार यांना तालुका अध्यक्ष पदाचं नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले यावेळी पाटोदा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

★आता नवीन विद्यार्थी युवकांना संधी : कुंदन काळे

संपूर्ण जिल्हाभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत यामध्ये नवीन विद्यार्थी युवकांना संधी देण्याचा मानस असून विद्यार्थी युवकांनी सक्रिय होऊन पक्ष संघटनेसाठी काम करावं..
– कुंदन काळे
राष्ट्रवादी विद्यार्थी मराठवाडा अध्यक्ष.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!