” मिशन सिंदूर “
ऑपरेशन सिंदूर राबवत
पाकड्यांना शिकवला धडा
त्यांच्या पापांचा सारा
भरला होता घडा.
वारंवार नका करू
तसल्या पुळचट कुरघोडी
नसता पुन्हा करू
पळता भुई थोडी.
आम्ही संयम ठेवला तरी
तुमचे चिडीचे डाव,
कसा काय घातला मग
आम्ही मानगुटीवर घाव.
हवेतील ड्रोन हल्ले
त्यांचे हवेतच विरले,
आपल्या बहादूर सैन्यांनी
अचूक नेम धरले.
सर्व सैन्य दलांनी
घेतले अमाप कष्ट,
नऊ दहशतवादी अड्डे
केले बरं का नष्ट.
भारतीय शूर वीरांनो
सदैव तुमचा गर्व,
क्षणोक्षणी आहोत आम्ही
तुमच्या सोबत सर्व!
तुमच्या सोबत सर्व!!
– श्री.संजय शेळके
पांढरी ता.आष्टी जि.बीड.
मो.9975228585