जाती-धर्मा पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा ” माणुसकीचा झरा ” म्हणजेच अतुल शेलार
कोणताही व्यक्ती जाती धर्माच्या नावाने मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्तुत्वाने मोठा होत असतो. कुसळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार हे पण एक असंच व्यक्तिमत्व आहे जे कुसळंब सह परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जातात लोकांना मदत करतात आणि त्यातून लोकांचे आशीर्वाद मिळवतात हीच त्यांची पद्धत सर्वांना आपलंसं करत आहे. आज सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना प्रथमता खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा आम्ही केलेला प्रयत्न…
आई वडिलांचे संस्कार जेव्हा मुलावर चांगले होतात तेव्हाच मुलं चांगली घडतात. तो संस्काराचा भाग असतो. त्याचबरोबर आजूबाजूचे वातावरण विचाराची झालेली परिपक्वता महापुरुषांचा झालेला प्रभाव हे पण तितकेच महत्त्वाचे मुद्दे असतात. या सर्वांच्या सानिध्यातून कुसळंब गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल शेलार यांच्या रूपाने माणुसकीचा झरा पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणतेही असो त्या ठिकाणी आपल्या हातून काही चांगलं होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी धावून जाणं आणि त्या व्यक्तीची मदत करणं ही अतुल अण्णाची ओळख आहे. कोणत्याही व्यक्तीला शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीची कमतरता भासली की त्याच्या तोंडी नक्कीच अतुल अण्णा शेलार यांचे नाव येत हा व्यक्ती आपल्याला मदत करेल का बरं कारण की अतुल यांचे काम अतुलनीय आहे. जेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत या व्यक्ती आपली मदत करू शकतो तेव्हा आपण समजून घ्यायचं की तो व्यक्ती विचाराने मनाने किती मोठा आहे. अतुल शेलार यांच्या विषयी लिहिताना शब्दही कमी पडतात कारण असं कोणतं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी त्यांनी आपलं काम केलं नाही. काम करताना वेळ काळ कधी पाहिला नाही त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कधी पाहिली नाही तो व्यक्ती कोणत्या जाती धर्माचा आहे ते कधी पाहिला नाही तो अडचणीत आहे त्याची मदत आपण करू शकतो आणि आपल्या मदतीने त्याचं चांगलं होऊ शकतं हेच मनामध्ये ठेवून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे अतुल अण्णा शेलार यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे म्हणूनच अशा व्यक्ती विषयी लिहिताना सुद्धा मला आनंद होतो कारण की लिहिणारा व्यक्ती आणि ज्याच्या विषयी लिहिणारा व्यक्ती हे विचार आणि परिपक्व असतात त्याचं लिहायचंय तो परिपक्व असल्याशिवाय त्याच्याविषयी लिहिताना आपल्यातील परिपक्वता सिद्ध होत नाही हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळेच आज आमचे स्नेही सामाजिक कार्यकर्ते अतुल अण्णा शेलार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या कार्यावर उजाळा टाकण्याचं माझं कर्तव्य आहे नक्कीच त्यांच्या कार्यावर उजाळा टाकताना मी कमीही पडलो असेल परंतु त्यांचं कार्य किती मोठ आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. अजूनही त्यांच्याविषयी लिहीत राहील यात शंका नाही कारण की त्यांच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या पडणार आहेत ते त्यांच्या जबाबदारीतून आपल्याला त्यांचं कर्तुत्व सिद्ध करून दाखवणार आहेत यातही मला शंका वाटत नाही कारण की ते विचाराने परिपक्व आहेत मग जेव्हा माणूस विचाराने परिपक्व होतो तेव्हा त्याला सर्व माणसाची मन कळतात आणि वळवताही येतात असं मला वाटतं अशाच व्यक्ती विषयी लिहिताना आनंद होत आहे पुन्हा एकदा अतुल अण्णा शेलार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या लेखणीला विराम देतो…
– प्रा.सचिन पवार
निर्भीड पत्रकार