पाटोद्यातील कर्तृत्ववान महिलांचा मराठी पत्रकार परिषदेकडून सन्मान!
★जागतिक महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांच्या पाठीवर मराठी पत्रकार परिषदेकडून कौतुकाची थाप देण्यात आली. पत्रकारांनी नेहमीच सामाजिक राजकीय धार्मिक आरोग्य सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना लेखणीतून उजाळा देण्याचे काम केलं आहे. पण यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा नारी सन्मान सोहळा आयोजित करून त्यांच्या कार्याचे कौतुक व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पाटोदा येथील रेणुका माता मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मराठी पत्रकार परिषद पाटोदा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार यांनी केले तसेच कार्यक्रमाला संबोधित करताना प्राजक्ता ताई धस यांनी विविध प्रश्नांना केंद्रस्थानी धरत मार्गदर्शन केले तर आईसाहेब यांनी महिलांविषयी महत्त्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. प्राजक्ताताई सुरेश धस संचालक महानंदा यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून वशिमा शेख उपविभाग अधिकारी पाटोदा, ह.भ.प. राधाताई महाराज आईसाहेब देवस्थान महासांगवी, ऍड.संगीताताई धसे समाजसेविका व दिपाली जाधव नगराध्यक्ष पाटोदा यांची विशेष उपस्थिती राहील तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय निलावड तहसीलदार पाटोदा, अजय जोशी मुख्य अधिकारी नगरपंचायत पाटोदा, सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक पाटोदा, सुभाष चौरे मराठी पत्रकार परिषद विभागीय समन्वयक, विशाल साळुंखे जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद बीड, छगनराव मुळे मराठी पत्रकार परिषद कोषाध्यक्ष बीड, रवी उबाळे मराठी पत्रकार परिषद विभागीय सचिव तसेच सचिन पवार उपजिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद बीड यांच्यासह पाटोदा नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सभापती यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी सदस्य सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखाताई खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले.
★यांनी केला कार्यक्रम यशस्वी!
अजय जोशी, हमीद पठाण, जावेद शेख, अशोक भवर, इद्रिस चाऊस, सोमनाथ खंडागळे, हरिदास शेलार, गोकुळ इंगोले, प्रदीप उबाळे, सतीश गर्जे, संजय सानप, दयानंद सोनवणे, सचिन गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता देशमाने, सय्यद फय्याज, नितीन भोंडवे यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत होते.
★सन्मान कर्तृत्ववान महिलांचा
मराठी पत्रकार परिषद पाटोदा शाखेकडून महिला जागतिक दिनानिमित्त पाटोदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा नारी सन्मान सोहळ्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने महिलांनी ही उपस्थिती लावली.. प्रथमच इतका मोठा कार्यक्रम पाटोदा नगरीत संपन्न झाल्याने मराठी पत्रकार परिषदेचे व सर्व सदस्यांचे कौतुक केले जात आहे.