★सन्मान लेखणीचा, विचाराचा, कर्तुत्वाचा!
पाटोदा | प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल पाटोदा तालुक्यातील निर्भीड पत्रकार सचिन पवार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने नाशिक येथे गौरविण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये हा गुणगौरव 5 जानेवारी रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्याकडून दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पत्रकार सचिन पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे, दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे, दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोज शिंदे, झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष भारती चव्हाण, भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, छंद दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, इत्यादी राज्यातून समानार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
★सलम तीन वर्षे विविध पुरस्काराने सचिन पवार सन्मानित!
पत्रकार सचिन पवार यांनी पत्रकारिता सुरू केल्यापासून हा तिसरा पुरस्कार आहे. सलग तीन वर्षापासून ते पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. अंबाजोगाई ते मराठी पत्रकार परिषदेकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर संगमनेर येथे दुसरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने तिसऱ्यांदा सन्मानित झाल्याने त्यांच्या उत्कृष्ट लेखणीवर, विचारावर, कर्तुत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याचे सिद्ध होत आहे.