★पाटोदा मराठी पत्रकार परिषदेचा कौतुकास्पद उपक्रम
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने दरवर्षी दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगाने याही वर्षी जिल्हा परिषद शाळा भिमनगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार इद्रिस चाऊस व बबन उकांडे हे होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी भाषेतील पहीले नियतकालिक दर्पण सुरू केले होते.याचे स्मरण म्हणून ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.पाटोदा मराठी पत्रकार परिषद नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजाचे प्रश्न लेखनीच्या माध्यमातून मांडत असतानाच केवळ लेखनीतुन समाजाचे प्रश्न सुटणार नाही या उध्दात हेतुने सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहून आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,वृक्षारोपण,विविध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप म्हणून सत्कार सोहळे आदी उपक्रम राबविले जातात याच अनुषंगाने ६ जानेवारी सोमवार रोजी दर्पण दिनानिमित्त जि.प.शाळा भिमनगर तसेच जि.प.उर्दु शाळा अरबगल्ली येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत साजरा करण्यात आले.तसेच जेष्ठ पत्रकार इद्रिस चाऊस, बबन उकांडे, अब्दुल कादर मकराणी आदींचे यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आले. यावेळी पत्रकार संजय सानप यांना बीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तावित हमीदखान पठाण यांनी केले तर पाटोदा शाखेचे अध्यक्ष अजय जोशी यांनी मार्गदर्शन करतांना पत्रकारांच्या अडचणी तसेच शासनाकडे पत्रकार भवन तसेच पत्रकारांना वसाहत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी अजय जोशी, प्रा.खंडागळे, हमीदखान पठाण,संजय सानप, भाऊसाहेब पवार,बबन उकांडे, इद्रिस चाऊस, जावेद शेख,आशोक भवर,नानासाहेब डिडुळ,हरिदास शेलार, बबन पवार, सचिन गायकवाड, गोकुळ इंगोले,महेश बेंद्रे, महेशर पटेल,फय्याज सय्यद,सतिष गर्जे,गणेश शेवाळे, बंडू डिडुळ आदी पत्रकार उपस्थित होते..