6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

सरपंचाच्या खूनाचं कोडं उलगडलं ?

सरपंचाच्या खूनाचं कोडं उलगडलं ? मारहाणीचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती, बड्या नेत्याचं कनेक्शन उघड

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले

बीड | प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी महामोर्चा काढत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आता या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेर्धात आज पुण्यातही निषेध मोर्चा काढण्यात आला. यामुळे आरोपींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव बनत चालला आहे.
दरम्यान आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. अटक केलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ सापडले आहेत. आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलध्ये हे व्हिडीओ सापडले असून पोलिसांनी हे सगळे व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘न्यूज १८ मराठी’ला दिली आहे.संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. यावेळी त्यांनी एक स्कार्पिओ गाडी रस्त्यात सोडून पळ काढला होता. पोलिसांनी ही गाडी त्यावेळी ताब्यात घेतली होती. यात पोलिसांना दोन मोबाईल सापडले होते. हे मोबाईल आरोपी सुदर्शन घुले आणि आणखी एका आरोपीचे होते. आता या मोबाईलमधून सीआयडीनं महत्वाचा पुरावा मिळवला आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओज मोबाईलमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.एवढेच नव्हे तर खुनाच्या वेळी आरोपीच्या मोबाईलवरून एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 फोन कॉल केल्याची माहिती देखील सीआयडी तपासातून समोर आली आहे. आता हा बडा नेता कोण? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. मात्र हा नेता सत्ताधारी पक्षातला असल्याचं सांगितलं जातंय.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!