2.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

बीड जिल्ह्यातून आ.पंकजाताई मुंडे व पुन्हा एकदा आ.धनंजय मुंडे यांची वर्णी!

★सर्वत्र आनंदोत्सव आता पालकमंत्री कोण? हा सर्वा समोर प्रश्न

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्या खालील राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या नागपूर येथील विस्तारात बीड जिल्ह्यातून भाजप कडून आ पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा कडून पुन्हा एकदा आ धनंजय मुंडे यांची वर्णी लागली असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती पालकमंत्री कोण होणार याची.
नवीन मंत्रिमंडळा मध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक,  दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभूराज देसाई आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भारत गोगावले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम आदींचा समावेश आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात बीड जिल्ह्यातून भाजप कडून आ पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा कडून पुन्हा एकदा आ धनंजय मुंडे यांची वर्णी लागल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आसून आता पालकमंत्री कोण होणार याची.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!