6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

कायदयानेच वाजवले कायद्याचे तीन तेरा!

★एकाला अंगाशी तर एकाला मांडीशी घेऊन प्रशासन करतंय कायदयाचा बोजवारा..!

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र समोर येत असून, जिल्हा पोलीस प्रशासनावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. गुटखा विक्री, अवैध मुरूम व वाळू उत्खनन, दारू विक्री, पत्त्यांचे क्लब, तिरट आणि चक्री जुगार यांसारखे अवैध व्यवसाय निर्भयपणे सुरू असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. या सगळ्यामागे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे.एकीकडे जिल्ह्यात धारा 144 लागू असतानाही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलने व निदर्शने सुरू आहेत. मोठमोठे नेते थेट एसपी कार्यालयात जाऊन निवेदन देताना दिसत आहेत. म्हणजे धारा 144 फक्त सामान्य माणसालाच का? असा प्रश्न उपस्थित होत असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या अधिकारांवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे होणारी ही आंदोलने प्रशासनाच्या हतबलतेचे स्पष्ट चित्र दाखवतात. असं जनतेतून बोललं जात आहे.
मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपास करून आरोपींना अटक केली असली, तरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाचा धाक उरलेला नाही, असे जनतेचे मत आहे. परळी शहरातील व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती. त्याच पाठोपाठ बीड शहरात गोळीबाराची घटना घडली. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठबळ कोणत्या ना कोणत्या नेत्याचा निघतोच म्हणून पोलीस प्रशासन हतबल होतो का?अशा घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.जिल्ह्यात सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पोलीस विभागाचे असले तरी ते दबावाखाली काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. जिल्हा पोलीस दलाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर जरी धरत असली तरी पोलीस प्रशासन दबावत आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!