भारतीय रिझर्व बँकेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नवीन धोरणाचा विशेषत: लहान शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा मिळणार
मुंबई : वृत्तांत
भारतीय रिझर्व बँकेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवली असून शेतकरी तारणमुक्त कर्ज मर्यादा 2 लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी शेतकरी तारणमुक्त कर्ज मर्यादा 1.6 लाख इतकी होती ती आता वाढवून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे विशेषत: लहान शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. या घोषणेचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही तारण घ्यावे लागणार नाही. पूर्वी ही मर्यादा 1.6 लाख रुपये होती, म्हणजेच कोणतेही तारण न देता, शेतकरी केवळ 1.6 लाख रुपयांपर्यंतच कर्ज घेऊ शकत होते, ज्याची मर्यादा आता 2 लाख रुपये झाली आहे.
याबरोबच RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार सलग 11व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर, सीआरआर दर कायम ठेवले. धोरणाबाबत एमपीसीची ‘तटस्थ’ भूमिका कायम ठेवली आहे. RBIने रेपो दर 6.50%, स्थायी ठेव सुविधा दर 6.25% आणि सीमांत स्थायी सुविधा दर 6.75% वर कायम ठेवला आहे. रेपो दर म्हणजे कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते. जेव्हा बँकांकडे निधीची कमतरता असते, तेव्हा ते मध्यवर्ती बँकेकडून पैसे घेऊ शकतात. या पैशावर रेपो दर लावला जातो. रेपो दराच्या मदतीने, एमपीसी महागाई नियंत्रित करते. जेव्हा त्याला महागाई नियंत्रित करायची असते. त्याच वेळी, जेव्हा बाजारात अधिक पैसे इंजेक्ट करण्याची आणि आर्थिक वाढीस समर्थन देण्याची आवश्यकता असते, तेव्हा रेपो दर कमी केला जातो.तसेच बँकांसाठी CRR 4% पर्यंत कमी – बँकांसाठी CRR 4.5% वरून 4% पर्यंत कमी केला. CRR 0.50% ने कमी झाला. 1.16 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोख प्रणालीमध्ये येईल. गव्हर्नर पुढे म्हणाले की, भारताचा जागतिक व्यापार मजबूत झाला आहे आणि खंड वाढला आहे. आरबीआयचे मुख्य काम महागाईवर नियंत्रण ठेवणे हे आहे. किमतीच्या स्थिरतेबरोबरच वाढही महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्थेतील पुनर्प्राप्ती सुरूच – Q2FY25 जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. Q3FY25 GDP वाढीचा अंदाज 7.4% वरून 6.8% पर्यंत कमी झाल्यानंतर पुनर्प्राप्ती चालू आहे.