12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुंडे व पवार घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या बाळासाहेब आजबेंना न्याय मिळणार का ?

बाळासाहेब आजबेंना विधान परिषदेवर घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी

★उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हे वाक्य आजबेंना सूट होतं

पाटोदा | प्रतिनिधी

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच राजकारण हे अनेक वर्षापासून पाडापाडी आणि सोडा सोडी असंच पाहायला मिळाला आहे त्याचं कारणही असा आहे एखाद्याला कोणता पद घ्यायचा असेल की कोणाचा तरी गेम करायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा असं चित्र आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये पाहायला मिळाला आहे. मग जिल्हा परिषद असो किंवा आमदारकी असो त्या ठिकाणी कोणताही नेता आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार आहे. पण याला अपवाद राहिले आहेत ते बाळासाहेब आजबे काका कारण की त्यांनी आज पर्यंत कोणाला धोका दिला नाही कोणाला फसवलं नाही याउलट एकनिष्ठ राहून स्वतःची निष्ठा काय आहे हे दाखवून दिल आहे त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी अध्यापटी कोण आहे. असे नेते राजकारणात असायला हवेत म्हणूनच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमधून त्यांना विधान परिषद मिळावी अशी मागणी होत आहे.
चांगले नेते राजकारणात यायला हवेत. राजकारणात चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. फसवा फसवी आडवा आडवी पाडापाडी सोडा सोडी असे करणारे नेते अनेक आहेत परंतु एकनिष्ठ राहून नेत्याप्रती समाजाप्रती आपली भावना स्वच्छ आणि निर्मळ असायला हवी हेच काम आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केला आहे म्हणूनच त्यांच्यावर कार्यकर्तेही तितकाच जीव ओवाळून टाकतात आणि आजबे काकाही कार्यकर्ते आणि जनतेवर जीव ओवाळून टाकतात म्हणूनच सर्वसामान्य जनतेमधून पुन्हा त्यांना विधान परिषदेवर घेऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी आणि राजकारणातील एकनिष्ठ नेत्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. विशेष करून स्वर्गीय मुंडे साहेबांनी आजबे काकांवर टाकलेला विश्वास त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवला साहेब गेल्यानंतर त्यांना म्हणावा असं महत्त्व दिलं गेलं नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला परंतु साहेबा बद्दलची निष्ठा दुसऱ्या पक्षातही त्यांनी तितकीच टेकून ठेवली. राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आल्यानंतर देखील त्यांनी मिरवणुकीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो हातात घेऊन त्यांच्याबद्दलची निष्ठा आणि प्रेम व्यक्त केलं हे सर्व जनतेने पाहिलं त्यांनी कधीही मुंडे कुटुंबीयांवर टीका तर सोडाच पण कधी राजकीय माध्यमातून देखील काही बोलले नाहीत याला म्हणायचं निष्ठा आणि हेच आजबे यांचं वेगळेपण आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनतेला कार्यकर्त्यांना आपलंसं वाटतं म्हणूनच आजबे काकांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर घेऊन आमदार करून जनतेची सेवा करण्यात संधी द्यावी अशी मागणी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून कार्यकर्ते सर्वसामान्य जनता करत आहे.

★आ.पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे, आ.अजित पवारांनी ठरवलं तर काका आमदार

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पाहायला मिळत असलेलं चित्र यावरून आता सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमधून एक सूर निघत आहे. पंकजाताई धनंजयभाऊ आणि अजितदादांना सर्वसामान्य कार्यकर्ते विनंती करत आहेत की बीड जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या दिशेने चालला आहे यामध्ये आता निष्ठावंत विकासाची दृष्टी नेत्यांची गरज आहे म्हणूनच बाळासाहेब आजबे यांना आमदार करून राजकारणात नवीन ट्विस्ट आणावा आणि सर्वसामान्य जनतेला मानसिकदृष्ट्या आधार द्यावा अशी मागणी होत आहे. मानसिक दृष्ट्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वसामान्य जनता खचली आहे, त्यांना आधार देण्यासाठी मुंडे आणि पवार घराण्यांनी आजबे यांना आमदार करून मानसिक दृष्ट्या आधार द्यावा अशी मागणी होत आहे.

★विधान परिषदेवर आजबे आमदार झाल्यास चित्र बदलेल!

मुंडे व पवार कुटुंबीयांनी मा.आ. आजबेंना पुन्हा एकदा विधान परिषदेवर आमदार करून जनतेची सेवा करण्याची संधी दिल्यास आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात राजकीय चित्र नक्कीच बदलेल अशा चर्चा सुरू आहेत. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे राजकीय चित्र सध्या वेगळ्या दिशेने सुरू आहे त्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेवर आजबेंना आमदार करून आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे राजकीय चित्र सुरळीत करण्याची संधी द्यावी अशी मागणी सुद्धा आणि चर्चा होत आहेत..

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!