ओबीसी का मराठा ? अनुभवी का परिवार ? ज्येष्ठ का युवक ? संधी कोणाला ?
★आ.धनंजय मुंडे, आ.सुरेश धस, आ.पंकजा मुंडे, आ.प्रकाश साळुंके कुणाला मिळणार संधी!
★बीडच्या पालकमंत्री पदावरून येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळणार ?
बीड | सचिन पवार
बीड जिल्ह्याचे राजकारण अतिशय वेगळ्या दिशेने सुरू आहे परिवारवाद, जातिवाद, अनुभवी, ज्येष्ठ अशातूनच निवडायचा आहे, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री. या सर्व गोष्टीचा विचार करूनच बीड जिल्ह्याची धुरा कोणाच्या हाती द्यायची हा प्रश्न सध्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापुढे उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पार्टी कडून आ.पंकजा मुंडे व आ.सुरेश धस यांचे नाव आघाडीवर असून राष्ट्रवादीकडून आ.धनंजय मुंडे व आ.प्रकाश साळुंके यांचे नाव पुढे येत आहे. यामध्ये परिवाराचा विचार केला तर आमदार पंकजा मुंडे यांचा पालकमंत्री पदावर दावा पहिला आहे. युवक आणि अभ्यासू म्हटलं तर धनंजय मुंडे यांचा दावा होतो. दुसऱ्या बाजूला अनुभवी आणि ज्येष्ठ नेता म्हटलं तर आमदार सुरेश धस आणि प्रकाश साळुंके यांचा पालकमंत्री पदावर दावा होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी आता काय निर्णय घेणार याकडे सर्व बीड जिल्ह्याचे लक्ष लागल आहे.
बीडचा पालकमंत्री जो कोणी होईल तो नक्कीच बीड जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या दिशेने घेऊन जाईल यात शंका नाही. वेगळ्या म्हणजेच या ठिकाणी जातीवाद आणि विकासात भेदभाव पाहायला मिळू शकतो असा अंदाज आणि कुजबुज बीड जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे झाले तर आष्टी मतदार संघावर विशेष लक्ष राहील आणि विकासात काय होईल सांगता येत नाही. जर सुरेश धस पालकमंत्री झाले तर बीड जिल्ह्याचे राजकारण नक्कीच वेगळच होईल यात शंका नाही. असं बोललं जात आहे की सुरेश धस झाले तर हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार होईल आणि झालेलं असेल यात शंका नाही. त्यामुळे बीड जिल्ह्याचा राजकारण आता कोणतं वळण घेणार हे पालकमंत्री झाल्यावरच सर्वांना कळेल तोपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका सर्वच मतदारांना आणि जनतेला घ्यावी लागणार आहे. जनतेची एवढीच अपेक्षा आहे की कोणीही पालकमंत्री व्हा पण बीडचा विकास हा बारामती सारखा करा आम्हाला काही देणं घेणं नाही त्यामुळे बीडच्या विकासात कोण भर घालू शकतो याचा विचार भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षश्रेष्ठीने करावा अशा अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून होत आहेत.
★परिवार म्हटलं की आ.पंकजा मुंडे आणि आ.धनंजय मुंडे यांचे नाव
बीडच्या पालकमंत्री पदावर नेहमीप्रमाणे परिवाराचा विचार केला तर मुंडे परिवार सर्वात आघाडीवर राहिले आहे त्यामुळे पालकमंत्री पदावर आमदार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा दावा असेल यात शंका नाही. पंकजा मुंडे जर पालकमंत्री झाल्या तर विकासाला देखील धार मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. मागच्या मंत्रिमंडळातील त्यांचा विकासाचा दृष्टिकोन पाहिला तर पंकजा मुंडे यांना पालकमंत्री म्हणून जास्त पसंती मिळत आहे.
★अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून आ.सुरेश धस आणि आ.प्रकाश साळुंके यांचे नाव
भारतीय जनता पार्टी कडून ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून सुरेश धस यांच्या नावाला पालकमंत्री म्हणून पसंती मिळू शकते आणि फडणवीस यांनी ठरवलं तर सुरेश धसच पालकमंत्री होऊ शकतात. अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचा विचार केला तर सुरेश धस यांना पालकमंत्री पद फडणवीस देऊ शकतात असा देखील अंदाज आणि चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.
★पालकमंत्री पदावरून बीडच राजकारण वेगळे वळण घेणार
बीड जिल्ह्यामध्ये सध्या मुंडे विरुद्ध धस असं चित्र जनतेसमोर आहे. याची परिणाम पुढील निवडणुकीत देखील पहायला मिळतील यात शंका नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मराठा ओबीसी झालेला वाद कोणी कोणाला सपोर्ट केला या पडलेल्या ठिणग्या. निवडून आल्यानंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे वर केलेले आरोप. त्यातून जनतेत झालेला उद्रेक. येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील परंतु तत्पूर्वी पालकमंत्री पद कोणाकडे जाते यावरून देखील बीडचं राजकारण भविष्यकाळात वेगळाच पाहायला मिळेल यात शंका नाही.