विधानसभेला मराठे सुट्टे सुट्टे झाल्याने भाजप बहुमताने सत्तेत!
★महाराष्ट्रामध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत अन् साथीला शिंदे-पवार असताना मराठ्यांचं कल्याण होईल का ?
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्रात नव्हे राज्यात आहे, असं सांगत जरांगे पाटलांनी विधानसभेला न लढण्याचा निर्णय घेतला आणि पाडापाडी केली. मग महाराष्ट्रातून मराठ्यांना आरक्षण मिळणार होतं तर निवडणुकीत सहभागी न होता शांत राहणं पसंत केल्याने भाजपने एक हाती सत्ता मिळवली तसेच शिंदे-पवार सोबतीला असल्याने ताकद वाढली. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर मराठ्यांना आरक्षण मिळेल का ? असा साधा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजात उपस्थित झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही आणि देत नाहीत असं म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांची आई माय काढली त्यांच्या विरोधात रान पेटवलं मग विधानसभेला असं काय झालं की जरांगे पाटील एकदम शांत झाले पण विधानसभेतून माघार घेत शांत बसून मराठ्यांना सुट्ट सुट्ट खेळण्याची संधी दिली. या सुट्टी खेळल्याने भाजपने एक हाती सत्ता मिळवली त्यांच्या सोबतीला पुन्हा शिंदे आणि पवार असल्याने आता त्यांना सत्तेतून तर कोणी खेचू शकत नाही परंतु विरोधी पक्ष देखील आवाज उठवायला राहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने उपोषण करण आंदोलन करणं योग्य ठरेल का ? जर मराठा समाजाने आंदोलन केले उपोषण केले तर आरक्षण मिळेल का ? उपोषण आंदोलनाला परवानगी मिळेल का ? ते करताना केसेस झाल्या तर त्या मागे घेतल्या जातील का ? असंख्य प्रश्न मराठा समाजामध्ये उपस्थित झाले आहेत. हे विचार करण्यापूर्वी जर जरांगे पाटलांनी पाडापाडी किंवा अपक्ष उमेदवार आपल्या विचाराचे उभे करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असते आणि तेच विधानसभेत मराठ्यांचे प्रश्न मांडून राहिले असते तर अधिक चांगलं झालं असतं अशा भावना सर्वसामान्य समाजामध्ये पसरले आहेत.. त्यामुळे आता आंदोलन करणं उपोषण करण योग्य ठरेल का ? जर केलं तर फडणवीस केसेस करणार नाहीत हे कशावरून ? त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून आरक्षणाच्या लढाईत सर्वसामान्य मराठा समाज उतरायचे की नाही असा विचार करत आहे.
★मुख्यमंत्री फडणवीस झाले तर..
›› महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर मराठ्यांना आरक्षण मिळेल का ?
›› मराठ्यांना उपोषण आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळेल का ?
›› उपोषण सुरू झाल्यावर लाठीचार्ज होणार नाही, केसेस होणार नाहीत याची खात्री आहे का ?
›› मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानावर पहिल्या इतका मराठा समाजा एकत्र येईल का ?
›› जे मराठ्याच्या मतावर निवडून आले आहेत ते मराठा आमदार आंदोलनात दिसतील का ?
★मराठ्यांचा विचार करून मुख्यमंत्री अजितदादा पवार झाले तर..
›› महाराष्ट्राच्या राजकारणावरून आणि मराठा समाजाच्या आंदोलनावरून असा अंदाज येत आहे की फडणवीस पुन्हा यू-टर्न घेऊन मुख्यमंत्री अजित पवार होऊ शकतात…
›› अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मराठ्यांना आरक्षण मिळेल का ?
›› का पुन्हा मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरक्षण बाजूला घेऊन जाणार ?
›› अजित पवार यांना मुख्यमंत्री करून पुन्हा मराठ्यांना शांत करण्याचा प्रयत्न होईल का ?
★मराठा समाजाने खरंच आंदोलन करावं का ?
मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर मराठा समाज एकवटला आणि जवळपास कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला. पण फडणवीसांनी जर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर ते आरक्षण टिकेल का ? किंवा कायम राहून देतील का ? एकूणच विचार केला तर मराठा समाजाने पुन्हा आंदोलन करावे का ? फडणवीसांचा राग कमी झाला का ? असे खूप प्रश्न मराठा समाजासमोर उपस्थित आहेत.. त्यामुळे पुन्हा मराठा समाजाने आंदोलन करावं का असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे..
★पाटलांनी मराठ्यांना सुट्ट सुट्ट केल्यानं फायदा झाला का तोटा ?
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा समाजाला मोकळीक दिली आणि कुणालाही मतदान करा असे जरांगे पाटलांनी आव्हान केले. या आव्हानानंतर मराठ्यांनी आपला नेता कोण त्याकडे पोट घेतली आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु एकंदरीत विचार केला तर भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला जेवढा त्रास दिला तेवढा फटका त्यांना बसला नाही उलट त्यांच्या 25 जागात भर पडली मग याचा फायदा पूर्णपणे भाजपला झाल्याचे दिसून येत आहे आता जर मुख्यमंत्री फडणवीस झाले तर काय ? मराठा सुटा सुटा झाल्याने फायदा फडणवीस झाला. आता फडणवीस यांच्या विरुद्ध त्याच भाषेत बोलायचं का शांत बोलायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की मराठ्यांनी भाजपलाच बहुमतात निवडून दिला आहे त्यामुळे आता भाजपच्या विरुद्ध बोलण्यापेक्षा ज्या आमदारांना मराठ्यांनी मतदान केले ते मराठे आपापले आमदारांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्यास सांगतील का ? आणि जरी मराठ्यांनी सांगितलं तरी त्या मराठ्यांचं मराठा आमदार ऐकतील का ? एकूणच मराठ्यांनी आंदोलन उपोषण न करता ज्यांना मतदान केले त्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात आंदोलन करायला सांगावं आणि विधानसभेत प्रश्न मांडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत हाच एक महत्त्वाचा पर्याय आहे…