मा.पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्री करावे : राजेंद्र खाडे
पाटोदा | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व लोकप्रिय आमदार मा.पंकजाताई मुंडे यांनी विधानसभा निवडणूक मध्ये स्टार प्रचारक म्हणून अनेक ठिकाणी सभा घेतल्या या सर्व ठिकाणी भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले यामुळे महाराष्ट्र राज्य मध्ये पंकजा मुंडे यांची असलेली लोकप्रियता दिसून येते त्यामुळे अशा प्रचंड जनाधार असलेल्या नेत्याला कॅबिनेट मंत्रीपदी संधी द्यावी अशी मागणी राजेंद्र खाडे भगवान भक्ती गड यांनी भाजपा पक्षाकडे केली आहे. यापूर्वी ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्र व विशेषता बीड जिल्ह्यात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या ज्यामुळे एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. दूरदृष्टी असलेल्या नेत्याला कॅबिनेटची संधी मिळाली तर अनेक विकास कामे मार्गी लागतील.लाडकी बहीण योजनेची कल्पना महायुती सरकारच्या समोर मांडणाऱ्या व ती योजना लागू करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पंकजा मुंडे यांना मंत्री पद दिल्यास ते अनेक कष्टकरी व सर्वसामान्य महिलांचे हात बळकट करण्यासारखे असेल त्यामुळे भाजपा पक्षाने सर्व गोष्टींचा विचार करून आमदार पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पदी संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते व सावरगाव घाट भगवान भक्ती गड येथील रहिवासी राजेंद्र खाडे यांनी केले.