12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

हरलो असलो तरी हा शेवट नाही ; नव्या जोमाने पुन्हा कामाला लागू

★कार्यकर्ता संवाद बैठकीत माजी आ.आजबेंनी दिला विश्वास

आष्टी | प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी कुणीही खचून जाऊ नये राजकारणात जय आणि पराजय हा चालतच असतो पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाची सुरुवात जो करतो तो नक्कीच येणाऱ्या काळात यशस्वी होत असतो तुमच्यासारख्या निस्वार्थी आणि निर्भीड कार्यकर्त्यांची फळी माझ्याबरोबर असल्यामुळे येणाऱ्या काळात आपण पुन्हा नव्या ताकदीनिशी मैदानात उतरून जोमाने कामाला लागू मी तुमच्या नेहमी बरोबरआहे येणारा काळ आपलाच आहे असा विश्वास माजी आ.बाळासाहेब आजबे यांनी कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी आ. बाळासाहेब आजबे काका यांनी शिराळ येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यादरम्यान गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पराभवाचे कारण देत विचार मंथन केले तर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आपला पराजय झाला आहे. जनतेने आपल्याला नाकारले आहे हे आपण मान्य केले पाहिजे परंतु हा पराभव कशामुळे झाला हेही जनतेला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही जनतेने पाहिली आहे. आपण केलेले विकासकामे ही जनता नक्कीच विसरू शकणार नाही आपला झालेला पराभव हा कशामुळे झाला आहे हे या ठिकाणी मी जरी सांगितले नाही तरी सर्वसामान्य जनतेला ते माहिती आहे त्यामुळे त्या खोलात मी जाणार नाही परंतु झालेला पराभव हा मान्य करून आपण सर्वांनी उद्यापासून नव्या जोमाने नव्या ताकतीनिशी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राजकारणात टिकून राहिले पाहिजे त्यासाठी उद्यापासून आपण जोमाने कामाला लागावे झालेल्या चुका कशा सुधारता येतील याकडे लक्ष देऊन गावागावात कार्यकर्ते जोडण्याचे काम करावे येणाऱ्या अडचणीला मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कुठलीही चिंता भीती मनामध्ये न बाळगता आपण आपले सामाजिक काम सुरू ठेवावे निवडणूक म्हटले की जय पराजय आलाच परंतु ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली ती लोकशाहीला धरून नाही एवढेच मी या ठिकाणी सांगेल येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण आपल्या गावातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडावी त्यांची लहान मोठे कामे करावीत व कार्यकर्ते कसे वाढतील याकडेही लक्ष दिले पाहिजे आपण प्रत्येक गावामध्ये जे विकासकामे केले आहेत ते विकास कामे सर्वसामान्य जनतेच्या नजरेस आणून द्या एवढी विकास कामे या अगोदरही कोणी केली नाहीत आणि यापुढेही कोणी करणार नाही असे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो त्यामुळे आपली उणीव जनतेला नक्कीच भासणार आहे असे असले तरी आपणही कशात कमी पडता कामा नये झालेल्या चुका सुधारून नव्या जोमाने सर्वांनी कामाला लागावे येणारा काळ आपलाच आहे, असा विश्वास यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाटोदा तालुका अध्यक्ष दीपक दादा घुमरे, विश्वास भाऊ नागरगोजे, काकासाहेब शिंदे, धैर्यशील थोरवे, युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, पंडित पोकळे, परसराम मराठे, हरिभाऊ दहातोंडे, नगरसेवक बाबुराव जाधव, महादेव डोके, अर्जुन काकडे, बाबा भिटे, अजिनाथ गळगटे, नगरसेवक नाजीम शेख, सरपंच पोपट शेकडे, बबन रांजणे, सिद्धेश्वर झांजे, दादासाहेब डोके, बाळासाहेब पिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!